Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Ravi Kishan : “मुंबईसाठी मराठा समाजासोबतचं भोजपुरी समाजानेही…”; मराठी-हिंदी वादावर दिली प्रतिक्रिया
राज्यासह मुंबईतही मराठी-हिंदी भाषा वाद पेटला आहे… मुंबईत राहूनही काही लोकं मराठी बोलण्यास नकार देत असून अशा अमराठी लोकांना मारहाण करणारे बरेच व्हिडिओ समोर येत आहेत… याच मुद्द्यावर अभिनेते आणि भाजपा खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांनी आपलं मत मांडलं असून हिंदी-मराठी भाषेवरून राज्यात सुरू असलेल्या वादावर आपलं परखड मत त्यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय आपलं मत मांडताना त्यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीची देखील आठवण करुन दिली आहे….(Entertainment News)

सध्या रवी किशन ‘सन ऑफ सरदार २’ (Son Of Sardar 2 movie) चित्रपटामुळे खास चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळीत राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये ते पोहचले. यावेळी बोलताना त्यांनी हिंदी-मराठी भाषावादावर भाष्य केलं. रवी म्हणाले की, “मी मराठी बोलतो, बोलू शकतो. मला खूप छान मराठी बोलता येतं. मी एक मुंबईकर आहे. मी मराठीत ‘मध्यमवर्ग’ नावाचा चित्रपटही केला होता. हे तर राजकारण आहे. महानगरपालिकांच्या निवडणुका येत आहेत. इथे भोजपुरी समाज गेल्या तीन-चार पिढ्यांपासून राहत आहे. जसं मुंबई या शहराला कोळी आणि पारसी समाजाने वसवलं आहे. मराठा समाजासोबतचं भोजपुरी समाज आणि सर्वांनी मिळून मुंबईसाठी आपला जीव दिला आहे. या सगळ्यांनी या शहरासाठी आपलं रक्त आणि घाम गाळला आहे”. (Latest Entertainment news)

पुढे रवी किशन असं देखील म्हणाले की, “अजूनही सगळे एकत्र राहत आहेत. सगळीकडे शांतता आहे, पण आता महानगरपालिकाच्या निवडणुका येत आहेत. ही निवडणूक खूप मोठी आहे. मला माहीतेय. कारण, मी राजकारणाचा अभ्यास केला आहे. संसदेत खूप पुस्तकं आहेत. गेल्या काही वर्षांत मी याबद्दल खूप काही वाचलं आहे. त्यामुळे मी हे सगळं माहिती घेऊनच बोलतोय”.
================================
हे देखील वाचा : Son Of Sardar 2 :”मी संजय दत्तच्या जागी आलो कारण…”; रवी किशन यांनी केला खुलासा
=================================
दरम्यान, रवी किशन यांच्या आगामी सन ऑफ सरदार २ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटात अजय देवगण, मृणाल ठाकूर, अश्विनी काळसेकर, संजय मिश्रा असे बरेच कलाकार आहेत. २०१२ मध्ये आलेल्या सन ऑफ सरदार चित्रपटाचा हा दुसरा भाग असून त्यात अजय देवगणसह सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्त यांची प्रमुख भूमिका होती. महत्वाचं म्हणजे सैयारा या चित्रपटाच्या क्रेझमुळे सन ऑफ सरदार २ चित्रपटाने २५ जुलै ही रिलीजची तारीख बदलून १ ऑगस्ट २०२५ केली आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi