हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

‘सचिन सोबत माझी कधीच मैत्री नव्हती’ Ashok Saraf सराफ यांनी स्वतःच Sachin Pilgaonkar यांच्याबरोबरच्या नात्यावर केलं भाष्य !
मराठी सिनेसृष्टीत गेली अनेक दशके आपली वेगळी छाप पाडणाऱ्या अशोक सराफ (Ashok Saraf) यांचं नाव घेतलं की चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. त्यांच्या अफलातून अभिनयशैलीमुळे आणि अचूक कॉमिक टायमिंगमुळे ते सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे लाडके झाले आहेत. ८०-९० च्या दशकात महेश कोठारे (Mahesh Kothare) लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांच्यासोबत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले. या चौघांची जुगलबंदी ही त्या काळात मराठी चित्रपटांचं यशाची गॅरंटी ठरत असे.(Ashok Saraf On Sachin Pilgaonkar)

सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ ही जोडी तर विशेष गाजली. मात्र अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी एक गंमतीदार आणि थोडंसं धक्कादायक विधान केलं “सचिन माझा आधी कधीच मित्र नव्हता” असे ते म्हणाले. त्यांनी सांगितलं की, “सचिनसोबत पहिल्यांदा ‘मायबाप’ या सिनेमात काम केलं. हा सचिनचा दिग्दर्शित पहिला सिनेमा होता. याच सिनेमातून आमची खरी ओळख झाली.” त्याआधी त्यांचं काही विशेष संवादही नव्हता. उलट, सचिनचे वडील शरद पिळगावकर यांच्याशी अशोक सराफ यांची मैत्री होती. शरद पिळगावकर हे त्या काळात प्रसिद्ध निर्माते होते आणि त्यांच्या सिनेमांत अशोक सराफ काम करत असत.

“मी जेव्हा शरदजींना भेटायला जायचो तेव्हा सचिन फक्त औपचारिकपणे ‘काय? बरा आहेस ना?’ एवढंच विचारायचा. त्यानंतर तो निघून जायचा आणि मी पण माझ्या कामाला लागायचो,” असं सराफ यांनी सांगितलं. पण एकदा का दोघं एकत्र काम करायला लागले, की त्यांच्यातील रसायनं एकदम जुळून आली. “सचिन काय सांगतोय हे समजून घेऊन, मी अभिनयातून ते नेमकं साकारायचो. आणि मी काय करू शकतो हे त्यालाही ठाऊक होतं. त्यामुळे आमचं एक भन्नाट ट्युनिंग तयार झालं,” असं सराफ म्हणाले. (Ashok Saraf On Sachin Pilgaonkar)
================================
================================
सचिनने दिग्दर्शित केलेल्या जवळपास १५ मराठी सिनेमांत अशोक सराफ प्रमुख भूमिकेत होते. एकत्र काम करताना त्यांची ओळख इतकी गहिरी झाली की ती मैत्रीत परिवर्तित झाली ती मैत्री आजपर्यंत कायम आहे. आज मराठी सिनेसृष्टीत ‘अशोक-सचिन’ ही जोडी केवळ विनोदी सिनेमांसाठीच नाही, तर एक सुंदर मैत्रीचं उदाहरण म्हणूनही ओळखली जाते.