लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Saiyaara Movie : बॉलिवूडमध्येही काका-पुतण्या वाद? चंकी पांडेंची ओळख दाखवायला अहानने एकेकाळी दिलेला नकार
सध्या सगळीकडे ‘सैय्यारा’ (Saiyaara) चित्रपटाने लोकांना वेडं केलं आहे…. अहान पांडे आणि अनित पड्डा (Ahaan Panday and ANeet Padda) यांच्या लव्ह स्टोरीने लोकं प्रामुख्याने Gen Z थिएटरमध्ये अक्षरश: रडत आहेत… या चित्रपटातून बॉलिवूडच्या पांडे कुटुंबातील अहान पांडे याने पदार्पण केलं आहे… चंकी पांडे यांचा पुतण्या आणि अनन्या पांडे हिचा भाऊ असणाऱ्या अहान पांडे याने खरंच पहिल्या पदार्पणात सॉल्लीड सिक्र मारला आहे… या चित्रपटामुळे स्टार किड्समध्ये अहानला पुढचा मोठा सुपरस्टार मानलं जात आहे. एकीकडे त्याच्या अभिनयाचं कौतुक सुरु असून दुसरीकडे अहान पांडे याचं काका चंकी पांडे (Chunky Panday) यांच्याबद्दलचं एक विधान व्हायरल होत आहे… ज्यात अहानने चंकी पांडेसोबतचे त्याचे नाते नाकारले होते. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात…(Bollywood News)

तर, ८ वर्षांपूर्वी, अहान पांडेने एकदा इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन केलं होतं.. ज्यात त्याला कुणीतरी काका चंकी पांडे यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता… त्यावेळी अहान चिडला होता. स्पॉटबॉयई यांच्या वृत्तानुसार, अहान पांडे असं म्हणाला होता की, “माझे आडनाव पांडे आहे हे मजेदार आहे, पण माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. माझे वडील आलोक शरद पांडे आहेत आणि पांडेंशी माझे हे एकमेव नाते आहे. मी माझ्या लोकप्रियतेमुळे बी-टाउनमध्ये माझी ओळख निर्माण केली आहे.”

दरम्यान, अहानच्या या विधानाने लोकांना आश्चर्य वाटलं होतं. कारण त्याचे वडील चिक्की पांडे हे चंकी पांडे यांचे लहान भाऊ आहेत. आणि त्या नात्याने अहान चंकी यांचा पुतण्या आणि अनन्या (Ananya Panday) हिचा चुलत भाऊ आहे. त्यावेळी मात्र अहानचा नाते स्विकारण्यास दिलेला नकार बॉलिवूडमध्येही काका-पुतण्यात वाद आहेत का हा प्रश्न निर्माण करणारं नक्कीच होता…(Entertainment News)
================================
=================================
दरम्यान, १८ जुलै २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘सैयारा’ चित्रपटाने अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे… इतकंच नाही तर सोनाक्षी सिन्हा हिचा निकिता रॉय, अनुपम खेर यांना तन्वही द ग्रेच हे चित्रपट सैय्यारा चित्रपटामुळे भरडले गेले आहेत… शिवाय, अजय देवगण याच्या सन ऑप सरदार २ चित्रपटाने रिलीज डेट २५ जुलै ऐवजी आता १ ऑगस्ट केली आहे… चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर सैय्यारा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत १७२.७५ कोटींची कमाई केली आहे…(Saiyaara box office collection)
================================
=================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi