Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार

“Sunny Deol माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट माणूस…”; निर्मात्याने असं नेमकं का म्हटलं?
बॉलिवूडमधला ताकदवान अभिनेता म्हणजे ‘सनी देओल’ (Sunny Deol)…. ‘बॉर्डर’, ‘गदर’ असे अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सनी देओल यांच्याबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्यासोबत काम केलेल्या निर्मात्याने फार मोठा खुलासा केला आहे.. चक्क सनी देओल हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट माणूस होता असं त्यांनी म्हटलं आहे… आता नेमकं प्रकरण आहे तरी काय जाणून घेऊयात….(Bollywood News)

बरसात, हा मैने भी प्यार किया है या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या सुनील दर्शन यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सनी देओलबद्दल बराच काळ मनात ठेवलेलं दुःख व्यक्त केलं आहे. सुनील यांचे अक्षय कुमार, सनी देओल यांच्याशी मतभेद होते. त्यांनी मुलाखतीत सनी देओलसोबतच्या भांडणाबद्दल सांगताना म्हटलं की, “सनी देओलने एका प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी पैसे घेतले होते, पण तो प्रोजेक्ट कधीच पूर्ण झाला नाही. त्याची कायदेशीर लढाई सुरुच आहे… शिवाय, सनी ‘जानवर’ चित्रपटात काम करणार होता, पण त्याने स्वतःच्या काही अडचणींमुळे नकार दिला आणि मग तो चित्रपट अक्षय कुमारने केला. पण अक्षयसोबतही सात चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर अक्षय कुमारसोबतही मतभेद निर्माण झाले”. (Entertainment News)

पुढे सुनील म्हणाले की, “अक्षय कुमार प्रत्यक्षात वाईट माणूस नाही, पण त्याची खूप बदनामी झाली आहे. त्याचे स्वतःचे गुण आहेत हे तुम्ही नाकारू शकत नाही. सनी देओल माझ्या आयुष्यातील आणि करिअरमधील सर्वात वाईट माणूस आहे, पण वर देव आहे. आता फक्त देवच न्याय करेल. ही मोठी लोकं आहेत आणि त्यांना त्याची अजिबात पर्वा नाही. पण मला खात्री आहे की कधीतरी देव न्याय करेल. मी त्याच्यासोबत तीन चित्रपट केले. मी त्याच्यासोबत माझा पहिला चित्रपट ‘इंतकाम’ (१९८८) केला. त्यावेळी सनी मोठा स्टार नव्हता पण त्याच्यात स्टारडमची क्षमता होती. त्याआधीही आमचं नातं होतं. ज्या प्रोजेक्टसोबत तो लॉन्च होणार होता त्यात आमची प्रमुख भूमिका होती. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता आणि मला त्यावेळी असं वाटत होतं की, चित्रपटांना त्याच्यासारख्या लोकांची गरज आहे”.
================================
हे देखील वाचा: Kajol : सनी देओलचा ‘गदर’ चित्रपट खरंच नाकारला होता का?
=================================
दरम्यान, इतक्या वर्षांनी निर्मात्याने केलेल्या या आरोपावर आता सनी देओल काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे… तसेच, सनी देओल यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर लवकरच लाहौर १९४७ या चित्रपटात आमिर खान आणि प्रिती झिंटासोबत ते झळकणार आहेत… याशिवाय, लवकरच ‘गदर ३’ (Gadar 3) देखील प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशा आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi