
Ahaan Panday : डेब्यु ‘सैय्यारा’ चित्रपटातच १५० कोटींचा टप्पा पार करणारा अहान आहे तरी कोण?
सध्या बॉलिवूड जगात एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे आणि तो म्हणजे ‘सैय्यारा’ (Saiyaara Movie)… बरं ही लव्ह स्टोरी असून यात सलमान खान किंवा शाहरुख खान नाही तर अहान पांडे (Ahaan Panday) या नवोदित अभिनेत्याने प्रेक्षकांना आणि विशेषत: यंग जनरेशनला वेडं केलं आहे… मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैय्यारा’ या चित्रपटातून अहान पांडे आणि अनिल पड्डा हे दोन नवे कलाकार इंडस्ट्रीत आले… विशेष म्हणजे या चित्रपटाने केवळ ७ दिवसांत १५० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे… डेब्यु चित्रपटातच अहान पांडे याने एक नवा रेकॉर्ड हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासात रचला आहे यात शंका नाही… जाणून घेऊयात अहान पांडे याच्याबद्दल….. (Bollywood News)

तर, अहान पांडे उद्योजक चिक्की पांडे यांचा मुलगा आहे. त्याची बहीण अलाना पांडे ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असून तिने अमेझॉन प्राइमच्या रिअॅलिटी शो द ट्राइबमधून पडद्यावर पदार्पण केलं होतं. अहान हा बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांचा पुतण्या असून अभिनेत्री अनन्या पांडे हिचा भाऊ आहे… अहानने ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले असून मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. अहानला लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये रस होता. अभिनयापूर्वी अहानला चित्रपट निर्मितीची आवड होती… निर्मिती सोबतच त्याला दिग्दर्शनाची देखील आवड होती… अहानने ‘फ्रीकी अली’, ‘मर्दानी २’ आणि नेटफ्लिक्सवरील सीरीज ‘द रेल्वे मॅन’ या प्रोजेक्टमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे… (Entertainemnt News)

================================
=================================
अभिनय, दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मिती व्यतिरिक्त अहानला संगीत, डान्स, फॅशन आणि ई-स्पोर्ट्समध्येही रस आहे… दरम्यान, अहान पांडे यांनी पदार्पणाच्या चित्रपटातच बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा टप्पा पार करत एक नवा इतिहास रचला आहे… १८ जुलै २०२५ रोजी रिलीज झालेल्या सैय्यारा चित्रपटाने आत्तापर्यंत १९७.३१ कोटींची कमी केली आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi