Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार

Saiyaara Movie : अहान पांडे आणि अनित पड्डाच्या चित्रपटाने रचला नवा इतिहास!
मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैय्यारा’ (Saiyaara) चित्रपटाने लोकांना अक्षरश: वेडं केलं आहे… यंगस्टर्स तर थिएटरमध्ये सैयारा पाहून ढसाढसा रडत आहेत… अहान पांडे आणि अनित पड्डा या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या डेब्यु चित्रपटात ७ दिवसांत १५० कोटींचा टप्पा पार करत एक नवा इतिहास नक्कीच रचला आहे… १८ जुलै २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘सैय्यारा’ चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडित काढून १५० कोटींचा टप्पा पार केला आहे. जाणून घेऊयात चित्रपटाची एकूण कमाई…(Bollywood News)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सैय्यारा चित्रपटाने पहिल्या दिवशी २१.५ कोटी, दुसऱ्या दिवशी २६ कोटी, तिसऱ्या दिवशी ३५.७५ कोटी, चौथ्या दिवशी २४ कोटी, पाचव्या दिवशी २५ कोटी, सहाव्या दिवशी २१.५ कोटी, सातव्या दिवशी १९ कोटी, आठव्या दिवशी १८ कोटी, नवव्या दिवशी ६.५६ कोटी कमवत आत्तापर्यंत १९७.३१ कोटींची कमाई केली आहे…
================================
=================================
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, ‘सैय्यारा’ चित्रपटाची सहाव्या दिवसाची कमाई पाहता या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ (१४८.४२ कोटी रुपये), सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ (१४८.५२ कोटी रुपये) आणि ‘सालार: सीज फायर – पार्ट १’ (१५२.६५ कोटी रुपये) यांसारख्या बॉलिवूडच्या हिट चित्रपटांना अधिकृतपणे मागे टाकले आहे… तसेच, थिएटर्समध्ये ‘सैय्यारा’ चित्रपटाची क्रेझ पाहता अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांच्या सन ऑफ सरदार २ चित्रपटाची रिलीज डेट बदलून आता १ ऑगस्ट करण्यात आली आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi