Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

‘ते’ हसू हरवलंय का? Chala Hawa Yeu Dya पुन्हा चर्चेच्या भोवऱ्यात!
महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान मिळवत तब्बल १० वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) अखेर नव्या पर्वासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय ! २६ जुलै रोजी नव्या पर्वातील पहिला भाग रिलीज झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली… आता पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या नेमक्या रिएक्शन्स काय आहेत चला तर जाणून घेऊयात… (Marathi Entertainment News)

तर, नुकतंच ‘झी मराठी’च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर “हा एपिसोड कसा वाटला?” असा प्रश्न प्रेक्षकांना विचारला गेला आणि त्या सैगमेंटमध्ये प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया अक्षरश: जीव ओतूनच मांडायला सुरुवात केली… अनेक प्रेक्षकांनी थेट सांगितलं की “आम्ही हसलो, पण ते जुनं ‘चला हवा येऊ द्या’ वाटलंच नाही!” निलेश साबळे, भाऊ कदम आणि सागर कारंडे यांची अनुपस्थिती प्रेक्षकांच्या भावना दुखावून गेल्यासारखी झाली. काहींनी तर थेट विचारलं “जर हेच बघायचं असेल, तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च बरी!” हास्यजत्रेतील कलाकारांचे पंच, संवादफेक आणि सादरीकरण अधिक झणझणीत वाटल्याचंही अनेकांनी ठामपणे मांडलं. (Entertainment News)

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमासोबत केलेली ही तुलना इतकी टोकदार होती की, काही चाहत्यांनी जुन्या ‘चला हवा येऊ द्या’ टीमला परत आणण्याची मागणी थेट कमेंट्समधून केलीये… “जुनं सोडून नवीन काय देताय, तेच जुने पाहायला आम्ही बसतो!” अशा टोकाच्या प्रतिक्रिया देखील काही नेटकऱ्यांनी दिल्या…”नव्या कलाकारांचं काम वाईट नव्हतं, पण ‘जुन्या टीमचा जिवंतपणा’ आणि ‘निलेश साबळेंच्या संवादांची मजा’ या गोष्टी नव्या पर्वात मिसिंग आहेत”, असं ठामपणे सांगितलं.
================================
=================================
एक मात्र नक्की की, या नव्या पर्वामुळे ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलायं … पण यावेळी चर्चेचा सूर हसवणारा नाही, तर थोडासा गंभीर आणि मेकर्सना विचार करायला लावणारा आहे! आता खरी उत्सुकता आहे की मेकर्स कार्यक्रमात काही बदल आणणार का? किंवा जुनं ‘चला हवा येऊ द्या’ चा फॉर्मेट आणि कलाकार रिटर्न येणार की अजून काही.. हे पाहण्याची सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे… शिवाय, स्वत: Ex Host निलेश साबळे काही रिएक्शन देणार का ? याचीही सगळे वाट पाहात आहेत यात शंका नाही..पण नेटकऱ्यांच्या अशाच जर प्रतिक्रिया राहिल्या आणि मेकर्स कडून काहीच पाऊलं उचलली गेली नाहीत तर ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi