Priya Marathe : ‘२ वर्षांपूर्वी ‘नमो रमो नवरात्री’मध्ये…’ रवींद्र चव्हाण

Mandala Murders : “तु साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून तुझी क्षमता”; सचिन पिळगांवकरांची लेकीसाठी पोस्ट!
नेटफ्लिक्सवरील ‘मंडला मंडर्स’ (Mandala Murders) ही वेब सीरीज सध्या ट्रेण्डिंग आहे… या सीरीजमध्ये अभिनेत्री श्रिया पिळगांवकर, वाणी कपूर आणि सुरविन चावला यांच्या प्रमुख भूमिका आहेत… दरम्यान, या सीरीजमध्ये श्रियाचा अभिनय पाहून तिचे चाहते तर खुश झाले आहेतच पण त्यासोबतच श्रियाचे वडिल सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत लेकीसाठी खास पोस्ट केली आहे… काय म्हणाले आहेत सचिन जाणून घेऊयात..(Bollywood News)

अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी सोशल मीडियावर श्रियाच्या (Shriya Pilgoankar) भूमिकेचं आणि सीरीजचं कौतुक केलं आहे… त्यांनी पोस्ट करत लिहिलं आहे की, “तुला जे काही प्रेम मिळत आहे त्यासाठी अभिनंदन श्रिया. तू साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून तुझी क्षमता दिसते. आम्हाला तुझ्या कामाबद्दल खूप अभिमान आहे. तू ‘मंडला मर्डर्स’मध्ये साकारलेली रुक्मिणी ही भूमिका तुझ्या इतर भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे.” (Entertainment)

पुढे त्यांनी असं देखील लिहिलं आहे की, “तू दाखवून दिलंस की, फक्त काही सीनमधूनसुद्धा एक कलाकार त्याच्या कामानं प्रेक्षकांच्या मनावर कशी छाप सोडू शकतो.” यावेळी त्यांनी सुप्रिया यांच्याबरोबरचेही काही फोटो शेअर केले असून, त्यामधून दोघांची प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. (Bollywood News Tadaka)
================================
हे देखील वाचा: Sachin Pilgoankar : जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगांवकरांच्या यशाचं सांगितलं कारण!
=================================
श्रिया पिळगांवकर हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘जय माता दी’, ‘इंटर्नल अफेअर्स’, ‘स्वाह’, ‘बटरफ्लाईज’, ‘सीता’, ‘१३ मसुरी’, ‘द गॉन गेम’, ‘इश्क-ए-नादान’,’ ‘मर्डर इन अगोंडा’, ‘अरण्या’, ‘ताजा खबर’ अशा अनेक चित्रपट आणि सीरीजमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत… (Shriya Pilgoankar Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi