लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Anushka Sharma हिचा ‘चकदा एक्स्प्रेस’ प्रदर्शित होणार नाही?
बॉलिवूडमध्ये काही सेल्फ मेड कलाकार आहेत ज्यात अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिचं नाव घ्यायला हवंच… २००८ मध्ये शाहरुख खान याच्यासोबत रब ने बना दी जोडी या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं… त्यानंतर एकाहून एक दर्जेदार चित्रपट देणारी अनुष्का गेले ३ वर्ष चित्रपटांपासून लांब आहे… २०२२ मध्ये आलेल्या Quala चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यावर दिसलीच नाही… संसारात मग्न असणाऱ्या अनुष्का हिचा ‘चकदा एक्सप्रेस’ (Chakda Express) हा चित्रपट येणार असं सांगण्यात आलं होतं… आता या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी दिली आहे… त्या काय म्हणाल्या आहेत जाणून घेऊयात…

अनुष्का शर्मा हिने २०२१ मध्ये मुलीच्या जन्मानंतर पुन्हा एकदा अभिनयक्षेत्रात येण्याची तयारी सुरु केली होती… माजी भारतीय महिला क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटात तिने काम करण्यास सुरुवात केली होती आणि चित्रीकरणही पूर्ण केलं होतं. या चित्रपटात रेणुका शहाणे यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून आता चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.
‘चकदा एक्स्प्रेस’ हा चित्रपट शुट पूर्ण होऊनही अजून प्रदर्शित झाला नाही. ‘फ्री प्रेस जरनल’च्या वृत्तानुसार आधी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता. परंतु, काही कारणांमुळे ती डील रद्द झाली. रेणुका शहाणे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “मला खूप वाईट वाटलं, कारण या चित्रपटासाठी प्रत्येकाने खूप मेहनत घेतली होती. अनुष्कानेही यासाठी स्वत:वर खूप काम केलं होतं. यामध्ये मी जे सीन केले ते खूप चांगले होते आणि म्हत्त्वपूर्ण होते. विशेष करून क्रीडा क्षेत्रातील स्त्रियांसाठी हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे.”

पुढे त्या म्हणाल्या, “झूलन गोस्वामी खूप छान आहेत. गरीब कुटुंबातून असतानाही त्यांनी मेहनतीने इतकं सगळं मिळवलं. तरीसुद्धा पुरुष व महिला खेळाडूंमधील भेदभाव याबद्दल आजही बोललं जातं. त्यामुळे मला वाटतं, ‘चकदा एक्स्प्रेस’ हा क्रीडा विषयाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे.” या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रोसित रॉय यांनी केलं असून आता खरंच माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अनुष्का शर्मा हिचा चकदा एक्सप्रेस रिलीजच होणार नाही का? असा प्रस्न उपस्थित झाला आहे…
================================
=================================
दरम्यान, अनुष्का शर्मा हिच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, ‘बॅंड बाजा बारात’, ‘बदमाश कंपनी’, ‘पी.के’, ‘पटियाला हाऊस’, ‘परी’, ‘जब तक है जान’, ‘दिल धडकने दो’, ‘सुलतान’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘सुई धागा’, ‘झिरो’, ‘संजू’ या चित्रपटांमध्ये तिने उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत… (Anushka Sharma movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi