Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Muramba Serial: 7 वर्षांनी पूर्णपणे बदलली रमा; दोन वेण्या कापल्या, इंग्रजीही शिकली…’मुरांबा’ मध्ये आता घडणार तरी काय?
Star Pravah वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’ आता एका मोठ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. गेल्या काही भागांमध्ये दाखवण्यात आलेल्या कथानकातील बदलांमुळे मालिकेचा संपूर्ण डावच बदलला आहे. आता मालिकेत ७ वर्षांचा लीप घेण्यात आला असून, या लीपनंतर ‘रमा’ आणि ‘अक्षय’ यांच्या नात्याचं भविष्य काय असेल, याकडे साऱ्या प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिलं आहे.(Muramba Serial )

कथानकानुसार, काही गैरसमजांमुळे रमा आणि अक्षय यांचं नातं मोडलं. त्यानंतर अक्षयने आपल्या मुली आरोहीसोबत नवीन आयुष्य सुरू केलं, तर रमा पाचगणीत जाऊन स्वतःची नवी ओळख निर्माण करू लागली. रमा आता एक खंबीर, स्वतंत्र आणि आत्मविश्वासू स्त्री म्हणून समोर आली आहे. तिने भूतकाळाशी असलेली नाळ तोडण्यासाठी दोन वेण्या कापल्या आहेत आणि आता ती आधुनिक पोशाखात, नव्या लूकमध्ये दिसत आहे.

रमाने फक्त बाह्यरूप बदललं नाही, तर ती आता पाचगणीतील एका नामांकित शाळेची ट्रस्टी म्हणून कार्यरत आहे. तिने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे. मात्र, भूतकाळ विसरून पुढे गेली असली तरी तिला आपल्या लेकीची कायमच आठवण येते. तिने तिच्या लेकीचं नाव ‘बबडू’ असं ठेवलेलं असून, ती आजही गोड पदार्थ स्वतः न खाता, इतरांना खाऊ घालतेय.(Muramba Serial)
=================================
हे देखील वाचा: Parinati Movie: छोटा पडदा गाजवल्यानंतर आता Akshar Kothari झळकणार ‘परिणती’ सिनेमात!
=================================
या लीपनंतर मालिकेतील रमा आणि तिच्या मुलीची भेट होणार का? रमा आणि अक्षय पुन्हा एकत्र येणार का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी खूपच औत्सुक्याचे ठरणार आहे. मालिकेतील नव्या ट्रॅकमुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसतो आहे. ‘मुरांबा’मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर रमाची भूमिका उत्तम प्रकारे साकारत असून, अभिनेता शशांक केतकर अक्षयच्या भूमिकेत आहे. त्यांची लेक आरोही ही भूमिका बालकलाकार आरंभी उबाळे साकारते आहे. ही मालिका दररोज दुपारी 1.30 वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीस येते.