Top 5 OTT Movies: या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेले

Kajol : १६ व्या वर्षी पहिला चित्रपट ‘बेखुदी’ मिळाला तरी कसा?
९०च्या दशकापासून ते अगदी २१व्या शतकापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री काजोल (Kajol) हिचा आज वाढदिवस… घरातूनच कलेचं, अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या काजोल हिला तिचा पहिला चित्रपट कसा मिळाला याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे… १९९२ मध्ये ‘बेखुदी’ (Bekhudi) या चित्रपटातून तिने अभिनेत्री म्हणून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं… हिंदीत जवळपास ३३ वर्ष काम करणाऱ्या काजोल हिला तिच्या उमेदीच्या काळातच सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाला होता.. विशेष म्हणजे फिल्मफेअरचा हा पुरस्कार पटकावणारी ती पहिली अभिनेत्री होती… चला तर जाणून घेऊयात बेखुदी चित्रपटाचा किस्सा… (Bollywood News)

तर, आई तनुजा (Actress Tanuja) ६०-७०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री… त्यामुळे लगानपणापासूनच अभिनय, शुटींग, कलाकार, शुटींगचे किस्से काजोलने अनुभवले होतेच… एकदा झालं असं की शाळेच्या सुट्टीत काजोल तिच्या जवळच्या मैत्रिणीसोबत तिच्या फोटोशूटसाठी गेली होती. काजोलला पाहून मेकअप आर्टिस्टने तिचाही मेकअप केला. काही वेळाने जेव्हा काजोलने मेकअप काढायला सुरुवात केली तेव्हा तिथे तिची आई तनुजा स्टुडिओत पोहोचली. आणि पुन्हा आईच्या सांगण्यावरून काजोलला मेकअप करुन फोटोशूट करावं लागलं…. अभिनेत्री नसताना तिचं पहिलं फोटोशुट सुप्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी केलं होतं. त्यावेळी राजाध्यक्ष ‘बेखुदी’ चित्रपटाच्या पटकथेवर काम करत होते. त्यांना काजोलचा चेहरा इतका आवडला की त्यांने तिचे फोटो काढले आणि बेखुदी चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रवैल यांच्याना दाखवले. त्यांनाही काजोल आवडली आणि ते चित्रपटाची ऑफर घेऊन थेट तनुजा यांच्या घरी गेले.
================================
हे देखील वाचा : Sridevi यांनी नकार दिलेल्या ‘या’ चित्रपटामुळे माधुरीला मिळाला धकधक गर्लचा टॅग!
================================
खरं तर, आई सुप्रसिद्ध अभिनेत्री असूनही काजोलला कधीच हिरोईन बनायचं नव्हतं. त्यामुळेच जेव्हा राहुल रवैल त्यांच्या घरी चित्रपटाची ऑफर घेऊन गेले होते तेव्हा तिने तो न घेण्याचा निर्णय घेतला होता… मात्र, नंतर तिने विचार केला की शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत आणि काही काम नाहीये, मग सुट्टीत चित्रपट का करू नये? आणि या विचारांमध्येच काजोलने चित्रपट करण्यास होकार दिला. आणि अखेर १९९२ मध्ये काजोलची ‘बेखुदी’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री झाली… (Kajol Debut Movie)

दरम्यान, काजोलने अनुपम खेर यांच्या एका शोमध्ये तिच्या पहिल्या चित्रपटाच्या शुटींगचा पहिला दिवस कसा होता हे सांगितले होते. ती म्हणाली होती की, “सेटवरील पहिला दिवस सोपा नव्हता. त्या दिवशी मुहूर्ताचा शॉट शूट केला जाणार होता. ९० च्या दशकात चित्रपटसृष्टीतील प्रत्येक नामवंत व्यक्तीला मुहूर्ताला बोलावण्याती पद्धत होती… आणि त्यानुसार ठरल्याप्रमाणे सर्वजण सेटवर पोहोचले होते, पण स्टेजवर चढताच माझ्या पोटात दुखू लागलं. मुहूर्ताचा शॉट होताच पहिल्याच शॉटच्या टेकमध्ये मी खाली पडले आणि मला फार ओशाळल्यासारखं झालं”…

दरम्यान, काजोलचा बेखुदी हा डेब्यू चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. मात्र, काजोलने तिचा आत्मविश्वास डगमगू न देता स्वत:ला सिद्ध करण्याचा निर्णय घेतला… आणि तिला अब्बास मस्तानच्या ‘बाजीगर’ (Baazigar) या चित्रपटात स्थान मिळालं. खरं तर, आधी या चित्रपटात श्रीदेवी (Sridevi) दुहेरी भूमिका साकारणार होत्या.. पण चित्रपटाच्या कथेनुसार दोन बहिणांपैकी एक मरते; त्यामुळे श्रीदेवी यांचं मरण प्रेक्षकांना पाहावणार नाही या कल्पनेने अखेर श्रीदेवींच्या ऐवजी चित्रपटात दोन बहिणींच्या भूमिकेसाठी काजोल आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांना कास्ट करण्यात आलं… आणि बाजीगर चित्रपटामुळे काजोल, शिल्पा शेट्टी आणि शाहरुख खान या तिनही नवोदित कलाकारांना विशेष ओळख आणि स्थान मिळालं…
================================
हे देखील वाचा: काजोल: गौतम राजाध्यक्षांचं ‘कुरूप वेडे पिल्लू’
=================================
काजोलच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर आजवर तिने ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘करण-अर्जून’, ‘ये दिल्लगी’, ‘हलचल’, ‘इश्क’, ‘राजू चाचा’, ‘फना’, ‘माय नेम इज खान’, ‘कभी खुशी कभी गम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.. तसेच, मनोरंजनसृष्टीतील तिच्या योगदानाची दखल घेत तिला केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देत सन्मानितही करण्यात आलं आहे… (Kajol Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi