Raanjhanaa : “नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा”; धनुषने व्यक्त केल्या भावना

Jarann Movie OTT Release: दमदार अभिनयात गुंफलेली भय आणि भावनांची उत्कंठावर्धक गोष्ट ‘जारण’ ओटीटीवर येण्यासाठी सज्ज!
मराठी सिनेसृष्टीने अलीकडच्या काळात अनेक विषयांना भिडवून काही ताकदवान सिनेमे प्रेक्षकांसमोर आणले आहेत. त्यातलाच एक ठसा उमठवणारा आणि समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट म्हणजे ‘जारण’. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात, झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘जारण’चा वादळी प्रवास प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. 8 ऑगस्टपासून ‘जारण’ ZEE5 वर प्रदर्शित होणार असून, त्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.(Jarann Movie OTT Release)

चित्रपटगृहांमध्ये जबरदस्त कमाई करत, 2025 च्या बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर केलं. अमृता सुभाष सारख्या प्रतिभाशाली अभिनेत्रीची मुख्य भूमिका आणि ती साकारत असलेली रहस्यमय स्त्रीची व्यक्तिरेखा हे या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे. पण ही गोष्ट केवळ एका स्त्रीची नाही, ती आहे एका संपूर्ण कुटुंबाच्या, जिथे दडपलेली भूतकाळाची छाया वर्तमानाला ग्रासते.

ही कथा आहे एका अशा घराची, जिथं भावनिक ओढ, अंधश्रद्धा, आणि भिती एकत्र गुंफलेली आहे. अमृता सुभाषच्या अभिनयात तीव्रता आहे, गूढतेची झलक आहे आणि मनाला सुन्न करणारा संयमही आहे. तिच्या भूमिकेच्या माध्यमातून भीती फक्त अंधारात नाही, ती आपल्या आत असते. हा विचार प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो. चित्रपटात अनिता दाते, किशोर कदम, अवनी जोशी, राजन भिसे आणि सीमा देशमुख यांसारख्या अनुभवी कलाकारांच्या भूमिकाही महत्त्वाच्या ठरतात. ही सगळी पात्रं मिळून एका अशा भयपटात प्राण फुंकतात, जो प्रेक्षकांना अंतर्मुख करतो आणि कथा संपल्यानंतरही मनात अनेक प्रश्न निर्माण करतो. दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते यांच्या लेखन-दिग्दर्शनात साकारलेला ‘जारण’ केवळ एका गूढ रहस्याचा पाठपुरावा करणारा सिनेमा नाही. तो आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टींवर भाष्य करणारा, रूढींना प्रश्न विचारणारा आणि सत्याच्या शोधात माणसाचं काय काय हरवतं याचं जिवंत चित्रण करणारा सिनेमा आहे.(Jarann Movie OTT Release)
===============================
===============================
हृषिकेश गुप्ते सांगतात, “ही केवळ कथा नव्हे, तर ही भावना आहे. प्रत्येक प्रतिक्रियेमागे आम्हाला मिळणारा आधार, शाबासकी हीच आमच्या टीमसाठी खरी प्रेरणा आहे. झी5 वर याचा अधिक मोठा प्रेक्षकवर्ग तयार होईल, याची खात्री आहे.” निर्माते अमोल भगत म्हणतात, “चित्रपटगृहांमधून जेव्हा प्रेक्षकांची गर्दी, वाढते शो आणि सोशल मीडियावरील प्रचंड सकारात्मक प्रतिसाद पाहिला, तेव्हा मन भरून आलं. हे सगळं आमच्या मेहनतीचा सच्चा परिपाक आहे.” ZEE5 च्या माध्यमातून ‘जारण’ आता प्रादेशिक सीमांपलीकडे पोहचतो आहे. मराठीत बनलेली ही कलाकृती आता जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचेल. भयपटांप्रमाणे नाट्यपूर्ण, पण अंतर्मुख करणारी आणि प्रश्न उपस्थित करणारी कथा ही ‘जारण’ची खरी ओळख आहे.