Top 5 OTT Movies: या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेले

‘श्वास’ फेम Ashwin Chitale ‘या’ कारणामुळे अभिनयापासून लांब
मराठी चित्रपटसृष्टीकडे लोकांचा दृष्टीकोन अधिक डोळसपणे पाहण्याचं कारण म्हणजे २००४ साली आलेला ‘श्वास’ (Shwas Movie) चित्रपट… आजोबा-आणि नातवाची एक ह्रदयस्पर्शी कथा मांडणाऱ्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार तर पटकावलाच; शिवाय प्रतिष्ठित अशा ऑस्कर पुरस्काराचं नामांकन (Best Foreign Language Film category) मिळवणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला… खरं तर हा चित्रपट उत्कृष्ट लेखन, उत्तम दिग्दर्शन यासाठी ओळखला गेलाच, पण या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचा अभिनय मनाला भिडला… चित्रपटात नातवाचं काम केलेलं अभिनेता अश्विन चितळे (Ashwin Chitale) याने आणि आजोबांचं पात्र साकारलं होतं अभिनेते अरुण नलावडे यांनी… पण तुम्हाला माहित आहे का आत सध्या श्वास मधला तो चिमुकला परशुराम कारतो तरी काय? चला तर मग जाणून घेऊयात कलाकृती मीडियाच्या नव्या #तो_सध्या_काय_करतो? या नव्या कोऱ्या कार्यक्रमातून…

कलाकृती मीडियाशी बातचीत करताना अश्विन चितळे याने ‘श्वास’ चित्रपटात संधी कशी मिळाली याचा किस्सा सांगताना म्हणाला की, “खरंतर ‘श्वास’ चित्रपटासाठी मी ऑडिशन दिली नाही.. मुळात झालं असं की लहानपणी मला घरी पाहूणे आले किंवा काहीही कार्यक्रम असला की माझ्यातील कला लोकांसमोर सादर करण्याची मला फार आवड होती… तर अशाच का कार्यक्रमात मी एकपात्री छोटंसं नाटक सादर करुन दाखवलं आणि ते पाहायाला श्वास चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांचे नातेवाईक आले होते आणि त्यांनी सांगितलं की आमच्या ओळखीचे एक कलाक्षेत्रातील व्यक्ती आहेत जे चित्रपटासाठी एक मुलगा शोधत आहेत आणि त्यांना मराठी भाषा बोलणारा आणि जाण असणारा मुलगा हवा आहे…. मग काय भेटायला गेलो आणि ती भेट म्हणजेच माझी ऑडिशन होती… ते काय करायचे? तर दिग्दर्शक शनिवार-रविवार मुंबईहून पुण्याला यायचे आणि मला फिरायला घेऊन जायचे… त्यावेळी वेगवेगळ्या प्रसंगामध्ये मी कसा रिएक्ट होतो हे ते पाहायचे आणि तीच माझी श्वास चित्रपटासाठीची ऑडिशन होती… आणि फायनली श्वास चित्रपटाचा मी एक अविभाज्य भाग झालो”….
================================
हे देखील वाचा : Kajol : १६ व्या वर्षी पहिला चित्रपट ‘बेखुदी’ मिळाला तरी कसा?
=================================
अश्विन याने पुढे सध्या चित्रपटांपासून किंवा अभिनयापासून लांब असण्याचं फार महत्वाचं कारण सांगताना असं म्हटलं की, “लहान असताना चित्रपटामुळे खरं तर शाळेला दांडी मारण्याची मुभा मला मिळत होती आणि त्यामुळे मी चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक असायचो.. अर्थात अभिनय आवडत होताच… मात्र, कालांतराने मी पक्का पुणेकर असल्यामुळे मुंबईची धावती लाईफ मला नकोशी वाटायला लागली आणि मी पुण्याला परत आलो… काही काळ मी चित्रपट, शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं पण तोचतोचपणा कुठेतरी आल्यामुळे जरा कंटाळलो… मग मला एकाने थेट रोमॅंटिक रोलसाठी विचारलं आणि मी चकितच झालो… मी त्यांना विचारलं की नक्की मलाच ऑपर करताय ना हा रोल? मी कसा दिसतो किंवा रोमॅंटिक रोलसाठी जे काही कौशल्य लागलं ते कदाचित माझ्याकडे नाहीये.. असं बरंच काही मी त्यांना म्हणालो.. त्यावर मला असं उत्तर मिळालं की कुणीही चालेल या रोमॅंटिक रोलसाठी.. ते ऐकून मी विचार केला की जर कुणीही चालेल तर मला ते करायचं नाही आणि मग मी अभिनयाव्यतिरिक्त वेगळा मार्ग निवडण्याचा विचार केला…”
पुढे अश्विन म्हणाला की, “त्यानंतर मी फारसी, पर्शियन भाषा शिकलो… प्रसिद्ध कवी रुमी यांच्या कविता किंवा त्यांचं लिखाण मी उर्दूमध्ये भाषांतरीत करत गेलो… आता मी फारसी भाषेचे क्लासेस देखील घेतो… त्यामुळे जगातील वेगवेगळ्या भाषांची एक आवड मला निर्माण झाली आहे आणि काहीतरी नक्कीच नवं शिकायला मिळतंय यात शंकाच नाही…”

अभिनयापासून लांब जाण्याचा त्रास झाला का असं अश्विनला विचारल्यानंतर तो म्हणाला की, “सरप्राईझिंगली मला अभिनयापासून लांब जाता फार त्रास झाला नाही… कारण, माझ्या आई-वडिलांनी माझ्या डोक्यात ती प्रसिद्धीची हवा कधी जाऊच दिली नाही… आई कायम म्हणायची की शिक्षण पुर्ण कर मग अभिनयात हवं तर करिअर कर.. कारण लोकं आज ओळखतात आणि उद्या विसरतात देखील… शिवाय याचीही जाणीव मला कायम करुन दिली की माझ्या अथक परिश्रमाने मला चित्रपट मिळाला नाही तो एक योगायोग होता आणि मला श्वास मिळाला.. त्यामुळे मी जे केलं आहे ते कौतुकास्पद आहेच पण तरी देखील त्याने हुरळून गेलं नाही पाहिजे हे माझ्या पालकांनी मला कायम सांगितलं आणि त्यामुळेच अभिनयापासून लांब जाताना मला त्रास झाला नाही…”
================================
=================================

दरम्यान, अश्विन चितळे याला भारताचे तत्कालीन दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार देखील मिळाला आहे… तसेच, अश्विन याने श्वास चित्रपटाव्यतिरिक्त जोर लगाके हैय्या, देवराई, टॅक्स नं ९२११ अशा बऱ्याच हिदी, मराठी चित्रपटांमद्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत… (Marathi Entertainment news)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi