Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘तुंबाड’ फेम दिग्दर्शक राही अनिल बर्वे घेऊन येणार Mayasabha; ‘हा’

“मुलं झोपू शकत नाहीयेत. त्यामुळे मी…” Dharmendra यांना डिस्चार्ज दिल्यानंतर

याला म्हणतात कमबॅक! पिवळी साडी, पायात मराठमोळी कोल्हापुरी चप्पल; Priyanka

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

लहानग्या गरजु मुलांसाठी गायिका Palak Muchhal बनली देवदुत; गिनीज बुक

न्यू नॅशनल क्रश अलर्ट! निळ्या साडीतल्या मराठमोळ्या Girija Oak ला

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Top 5 OTT Movies: या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेले ‘हे’ सिनेमे तुम्ही पाहिलेत का?

 Top 5 OTT Movies: या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेले ‘हे’ सिनेमे तुम्ही पाहिलेत का?
मिक्स मसाला

Top 5 OTT Movies: या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेले ‘हे’ सिनेमे तुम्ही पाहिलेत का?

by Team KalakrutiMedia 05/08/2025

ओटीटीवरील कंटेंटचा रसिकांमध्ये वाढता प्रभाव आणि प्रेक्षकांच्या आवडी-निवडींनुसार बदलत चाललेला कल याचा परिपाक म्हणजे आठवड्याच्या टॉप ट्रेंडिंग चित्रपटांची यादी. ऑरमॅक्स मीडियाने नुकताच जाहीर केलेल्या अहवालानुसार, प्रेक्षकांनी या आठवड्यात सर्वाधिक पाहिलेल्या पाच ओटीटी चित्रपटांची यादी समोर आली आहे. प्राइम व्हिडीओ आणि जिओ सिनेमा यांसारख्या प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. या यादीत नवोदित कलाकारांपासून ते मोठ्या बजेटच्या चित्रपटांपर्यंत विविध प्रकारचे सिनेमे पाहायला मिळतात, ज्यामुळे प्रेक्षकांची पसंती किती वैविध्यपूर्ण आहे, हे देखील स्पष्ट होतं. चला तर मग नजर टाकूयात  या आठवड्यात प्रेक्षकांनी सर्वाधिक पाहिलेले पाच ओटीटी चित्रपट कोणते आहेत त्यावर.(Top 5 OTT Movies)

१. सरजमिन

सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे सरजमिन. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याचा हा दुसराच चित्रपट असूनही त्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. IMDb रेटिंग्स सरासरी असल्या तरी इब्राहिमच्या कामगिरीमुळे आणि चर्चेमुळे हा चित्रपट ओटीटीवर नंबर १ ठरला आहे.

Top 5 OTT Movies

२. हाऊसफुल ५

बॉलीवूडची लोकप्रिय हास्य मालिका ‘हाऊसफुल’चा पाचवा भाग, हाऊसफुल ५, दुसऱ्या क्रमांकावर आहे. ६ जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर लगेचच हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर आला. २२५ कोटींच्या बजेटवर तयार झालेल्या या सिनेमाने जवळपास २२० कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे ओटीटीवरही प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने त्याचा आनंद घेतला.

Top 5 OTT Movies

३. रोंठ

या आठवड्याचा तिसरा सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट आहे रोंठ. मल्याळम भाषेतील हा गुन्हेगारी थरारपट आहे, जो जिओ सिनेमा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. उत्तम कथा, मजबूत अभिनय आणि IMDb वर मिळालेली ७.२ रेटिंग यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.(Top 5 OTT Movies)

Top 5 OTT Movies

===========================================

हे देखील वाचा: Jarann Movie OTT Release: दमदार अभिनयात गुंफलेली भय आणि भावनांची उत्कंठावर्धक गोष्ट ‘जारण’ ओटीटीवर येण्यासाठी सज्ज!

===========================================

४. कुबेरा

कुबेरा या तामिळ-तेलगू द्विभाषिक अॅक्शन चित्रपटाने चौथा क्रमांक पटकावला आहे. धनुष, नागार्जुन, रश्मिका मंदाना, जिम सर्भ आणि दलीप ताहिल यांसारखे दिग्गज कलाकार या सिनेमात आहेत. २० जून रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

Top 5 OTT Movies

५. 3BHK

सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची घर खरेदी करण्याची स्वप्नं आणि त्यामागची कथा मांडणारा 3BHK हा चित्रपट पाचव्या स्थानी आहे. प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याच्या साध्या, भावस्पर्शी कथेमुळे प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे.

Top 5 OTT Movies

तुम्ही अजूनही हे ओटीटी वरचे सिनेमे पाहिले नसतील तर या वीकेंडला नक्की पाहा. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: 3bhk movie ott Celebrity Entertainment housefull 5 movie ibrahim ali khan Kajol kubera movie ronth movie Sarzameen OTT Sukumaran tamil movie Top 5 OTT Movies
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.