Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….

Perfect Family Series Trailer: सोशल मिडिया सेन्सेशन गिरिजा ओक च्या

Isha Keskar चा ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेला रामराम? मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे चर्चांना

Bollywood : हिरोईनने नकार दिल्याने कोणता कलाकार फिल्म इंडस्ट्रीच सोडून

Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा

‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

Bigg Boss 19 च्या नव्या व्होटिंग ट्रेंडनुसार Gaurav Khanna नाही तर

Asha Marathi Movie Teaser: बाईपणाच्या संघर्षाची गोष्ट दाखवणाऱ्या रिंकू राजगुरुच्या

जेव्हा Amitabh Bachchan आणि धर्मेंद्रचे सिनेमे एकाच आठवड्यात प्रदर्शित झाले!

१,३०० मुलींना पछाडत २० वर्षांची ‘धुरंधर’ चित्रपटातील रणवीर सिंगची नायिका

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Abhanga Repost: गणेशोत्सवानिमित्त ‘अभंग रिपोस्ट’ ची मैफल आता टीव्हीवरही अनुभवता येणार; पाहा कुठे आणि कधी?

 Abhanga Repost: गणेशोत्सवानिमित्त ‘अभंग रिपोस्ट’ ची मैफल आता टीव्हीवरही अनुभवता येणार; पाहा कुठे आणि कधी?
टीव्ही वाले मिक्स मसाला

Abhanga Repost: गणेशोत्सवानिमित्त ‘अभंग रिपोस्ट’ ची मैफल आता टीव्हीवरही अनुभवता येणार; पाहा कुठे आणि कधी?

by Team KalakrutiMedia 06/08/2025

गणपती बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहात अवघा महाराष्ट्र रंगून जातो. शहर असो की गाव, गल्लीपासून ते मंचांपर्यंत सगळीकडेच एक वेगळीच चैतन्याची लहर उसळते. जणू दरवर्षी नव्याने आलेला बाप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि समाधान घेऊन येतो. आणि अशा या पावन पर्वाचं औचित्य साधून ‘सन मराठी’ या वर्षी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक खास गणेशोत्सव विशेष कार्यक्रम-‘सन मराठी गणेशोत्सव २०२५’. (Abhanga Repost Band)

Abhanga Repost Band

गणेशोत्सवाचे आगमन होताच वातावरणात भक्तिमयतेची, मंगलतेची आणि सर्जनशीलतेची एक सुंदर सरमिसळ अनुभवायला मिळते. ‘सन मराठी’ने यंदा हे सर्व एकत्र गुंफत प्रेक्षकांसाठी एक असामान्य सांस्कृतिक मेजवानी उभी केली आहे. या विशेष कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची सादरीकरणं. त्यांच्या आवाजातील गूढ भक्तिभाव आणि शुद्धतेचा अनुभव प्रेक्षकांना अगदी थेट मनापर्यंत पोहोचणारा ठरणार आहे. त्याचसोबत सध्या युवा वर्गात लोकप्रिय ठरलेला ‘अभंग रिपोस्ट’ हा ग्रुप कार्यक्रमात एक नवे चैतन्य घेऊन येणार आहे. पारंपरिक अभंगांना आधुनिक वाद्यसंगतीची साथ देत हे कलाकार अभंगांना आजच्या पिढीशी अधिक जोडून देतात. त्यांच्या या सादरीकरणामुळे प्राचीन भक्तिसंगीत आणि आजचं आधुनिक संगीत यांचा अप्रतिम संगम अनुभवता येईल.

Abhanga Repost Band

याच कार्यक्रमात ‘सन मराठी’ कुटुंबातील सर्व मालिकांतील लाडके कलाकार एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यांनी सादर केलेले खास नृत्य, गायन, नाट्य आणि मजेशीर खेळ, गमतींचे सत्र हे कार्यक्रमात रंगत आणतील. हे केवळ परफॉर्मन्स नाहीत, तर गणरायाच्या चरणी अर्पण केलेलं कलाकारांचं प्रेम, श्रद्धा आणि आनंद आहे. प्रेक्षकांनाही हे क्षण एक वेगळा ऊर्जा आणि आनंद देऊन जाणार आहेत. ५ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह, महाजनवाडी, मीरा रोड येथे मोठ्या थाटात पार पडला. हा प्रवेश विनामूल्य होता, मात्र जागा मर्यादित असल्यामुळे ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व’ तत्त्वावर प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाची बातमी किंवा फोटो ‘पास‘ म्हणून दाखवूनही अनेकांनी सहभाग नोंदवला.(Abhanga Repost Band)

=======================================

हे देखील वाचा: Aamhi Saare Khavayye चं दमदार कमबॅक; ‘जोडीचा मामला’ सह होणार आंबट-गोड खुलासा !

=======================================

‘सन मराठी गणेशोत्सव २०२५’ हा कार्यक्रम म्हणजे भक्ती, संगीत, रंगमंचीय सौंदर्य, कलाकारांचा जल्लोष आणि गणेशभक्तांच्या प्रेमाचा एकत्रित सोहळा. प्रेक्षकांसाठी ही एक खास गणेशोत्सवाची ट्रीट ठरणार असून, २७ ऑगस्टच्या आसपास हा कार्यक्रम ‘सन मराठी’वर प्रसारित होणार आहे. तेव्हा आपणही या भक्तिपूर्ण उत्सवाचा भाग व्हायला विसरू नका.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: abhang repost band abhang repost songs abhanga repost band abhanga repost event Entertainment ganpati singer rahul deshpande sun marathi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.