Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या Akshay Kumar याच्या ‘त्या’ चित्रपटाचं झालं तरी काय?

 छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या Akshay Kumar याच्या ‘त्या’ चित्रपटाचं झालं तरी काय?
मिक्स मसाला

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या Akshay Kumar याच्या ‘त्या’ चित्रपटाचं झालं तरी काय?

by रसिका शिंदे-पॉल 07/08/2025

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जितके ऐतिहासिक चित्रपट यावे तितकेच कमी वाटतात… काही चित्रपट आले पण काही अजूनही बरीच वर्ष लोटून गेली तरी अडकलेच आहेत.. यापैकी एक चित्रपट म्हणजे महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात…’ या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार होता… मात्र, केवळ चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर पुढे चित्रपटाचं काय झालं हे अद्याप कुणालाच माहित नाही… त्यामुळे चित्रपट बंद झाला की काय अशा चर्चा होऊ लागलेल्या. आता चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे…

महेश मांजरेकरांच्या या चित्रपटात अभिनेता विराट मडके जिवाजी पाटील ही भूमिका साकारणार होता. नुकताच त्याने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे…. तो म्हणाला की,”चित्रपट खूप सुंदर शूट झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट खूप चांगला बनला. महाराजांच्या काळातली कोणतीच गोष्ट तुम्ही काल्पनिक दाखवू शकत नाही या गोष्टीला तिथे वाव होता. प्रतापरावांसोबत जे सहा जण लढलेले ते नक्की कोण होते याचं ठाम उत्तर कोणाकडेच नाही. याबाबत अधिकृत नोंदही नाही. बाबासाहेब पुरंदरेंनी जी नाव लिहिली तीच लोकप्रिय झाली आहेत. महेश सरांनी त्यांच्या पद्धतीने अभ्यास करून हे सहा वीर दाखवले आहेत. प्रत्येकाची कथा खूप छान गुंफली आहे. अक्षय कुमारने सुद्धा खूप छान भूमिका निभावून नेली आहे. त्यात पाहून त्याला मराठी येत नाही असं वाटत नाही.”

=======================================

हे देखील वाचा: Aamhi Saare Khavayye चं दमदार कमबॅक; ‘जोडीचा मामला’ सह होणार आंबट-गोड खुलासा !

=======================================

दरम्यान, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अक्षय कुमार शिवराय साकारणार असल्यामुळे सगळ्यांचं विशेष लक्ष या चित्रपटाकडे आहे… या चित्रपटात अक्षयसोबत सत्य मांजरेकर, प्रवीण तरडे, विशाल निकम, हार्दिक जोशी, जय दुधाने, विराट मडके, आणि उत्कर्ष शिंदे ही स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

शिवाय, विराटच्या बोलण्यातून एक गोष्ट फिक्स आहे की वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपट रेडी तर झाला आहे… आता तो नेमका रिलीज कधी होणार याची सगळेच आतुरनेते वाट पाहातायत… मेहश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाचा आपल्याला अंदाज आहेच पण अक्षय कुमार शिवराय कसे साकारणार याकडे सगळ्यांचं विशेष लक्ष लागलंय… बरं हा चित्रपट अनाऊन्स झाल्यानंतर मांजरेकरांनी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट केला आणि तो रिलीजही झाला… इतकंच नाही तर ते स्वत: रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या बिग बजेट चित्रपटातही दिसणार आहेत… मग नेमकं ‘वेडात मराठे ….’ चित्रपटाचं काम कुठे अडलंय हे समजायला स्कोप नाहीच आहे.. पण असो… विराटने म्हटलंय म्हणजे शुट बऱ्यापैकी झालेला हा मुव्ही येईल अशी अपेक्षा आहे… आणि समजा नाहीच आला तर या आधी देखील असे बरेच चित्रपट अनाऊन्स होऊन किंवा मुहूर्त करुन बंद पडले होते… पण या बंद पडलेल्या चित्रपटांच्या यादीत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट नसावा हीच अपेक्षा आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Akshay Kumar Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity chattrapati Shivaji maharaj Entertainment jai dudhane mahesj manjrekar marathi entertainment news marathi historical movies pravin tarade satya Manjrekar utkarsh shinde vedat marathe veer daudale saat movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.