Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

Manoj Bajapayee : चिन्मय मांडलेकरचा ‘इन्सपेक्टर झेंडे’ लवकरच रिलीज होणार
मराठी मालिका, चित्रपटांमधून लिखाण, अभिनय करत थेट हिंदीत आपला जम बसवणाऱ्या चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांनी आता थेट नेटफ्लिक्स हे जगातील सर्वात मोठं ओटीटी प्लॅटफॉर्म गाठलं आहे… लवकरच चिन्मय मांडलेकर लिखित आणि दिग्दर्शित इन्सपेक्टर झेंडे हा चित्रपट रिलीज होणार आहे… (Bollywood News)

७०-८० च्या दशकातला ‘स्विमसूट किलर’ तिहार जेलमधून फरार होतो, तेव्हा एक शूर वीर पोलिस अधिकारी त्याला पकडण्याचा निर्धार करतो. आणि त्याला ज्या पोलिसांनी दोनदा जेरबंद केलं होतं ते म्हणजे मराठमोळे पोलीस अधिकारी मधुकर झेंडें…. खऱ्या घटनांवर आधारित ही कथा जिद्द आणि धाडसाची आहे, त्यांच्याच धाडसी कामगिरीवर आधारीत नेटफ्लिक्सवर ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे…
================================
हे देखील वाचा : Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं होतं करिअर
=================================
दरम्यान, इन्सपेक्टर झेंडे या चित्रपटात मराठमोळी स्टारकास्ट असून त्यांच्यासोबत अभिनेते मनोज बाजपेयी दिसणार आहेत… मनोज बाजपेयी ‘इन्स्पेक्टर मधुकर झेंडे’ यांची भूमिका साकारत असून, जिम सरभ ‘स्विमसूट किलर’ कार्ल भोजराज चोराच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच,चित्रपटात भालचंद्र कदम, गिरीजा ओक आणि हरीश दूधाडे असे काही मराठी कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. दरम्यान, मनोज वाजपेयी यात मराठमोळ्या पोलिसाची भूमिका साकारणार असल्यामुळे प्रेक्षक विशेष उत्सुक आहेत… ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा सिनेमा ५ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. (Manoj Bajapayee Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi