‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Laxmikant Berde : “राजकारणात इतके कॉमेडियन आहेत, तिथे माझी…”
विनोदाचा बादशाह म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde)… मराठी मनोरंजनसृष्टीला एक अविस्मरणीय काळ त्यांनी आपल्या अभिनयातून दिला… विनोदी भूमिका तर त्यांनी गाजवल्याच पण एक होता विदुषक चित्रपटातील हटके भूमिका देखील जबाबदारीने बजावली… मराठीसह हिंदीतली आपलं प्रस्थ निर्माण करणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे… अभिनेते शेखर सुमन (Shekhar Suman) यांनी लक्ष्मीकांत यांची घेतलेली ही मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे… नेमकं यात बेर्डे काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात…

तर, शेखर सुमन यांच्या Movers & Shakers या शो मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांना “तुम्ही हिंदी चित्रपटात बरंच काही मिळवलं. मराठी रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये कामं करत राहिलात. तुम्ही कधी असा विचार केला नाही का की अभिनेता आहोत आता नेता बनूयात.. राजकारणात जाऊयात?”. या प्रश्नाचं क्षणाचाही लविंब न करता लक्ष्मीकांत बेर्डेंनी उत्तर दिलं की, “राजकारणात इतके कॉमेडियन आहेत, तिथे माझी काय गरज आहे?”. त्यांचे हे उत्तर ऐकून शेखर सुमन यांनाही हसू आवरलं नाही… (Entertainment News)
================================
=================================
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रंगभूमीवरुन त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरु केला होता… ‘टुरटुर’ हे त्यांचं विशेष गाजलेलं नाटक…. पुढे १९८४ मध्ये ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आणि मागे कधी वळून पाहिलंच नाही… ‘अशी ही बनवा बनवी’, ‘झपाटलेला’, ‘धुम धडाका’, ‘धडाकेबाज’, ‘अफलातून’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘हमाल दे धमाल’ असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी केले आणि त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांनी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं. मराठीसोबतच हिंदीत ‘हम आपके हैं कौन’, ‘मैने प्यार किया’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली… विनोदाचं अचुक टायमिंग साधणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांचं मृत्यूबद्दल टायमिंग फारच चुकलं… फार लवकर मनोरंजनसृष्टीला पोरकं करुन गेलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशिवाय विनोदी चित्रपटसृष्टी अपुर्ण आहे यात शंकाच नाही…(Laxmikant Berde Interview)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi