Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

Nana Patekar एक्स गर्लफ्रेंड मनिषा कोईरालाबद्दल काय म्हणाले?

Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

अनुराधा : Hrishikesh Mukherjee यांची भावरम्य कविता!

Amitabh Bachchan यांचं खरं नाव ‘हे’ असतं; भाऊ अजिताभने केला

Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!

Bappi Lahiri ने संगीत दिलेल्या गाण्याला किशोर कुमारने कसे इम्प्रोवाइज केले?

‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Uma Devi : बॉलिवूडच्या पहिल्या कॉमेडी क्वीनचं वेदनादायी आयुष्य….

 Uma Devi : बॉलिवूडच्या पहिल्या कॉमेडी क्वीनचं वेदनादायी आयुष्य….
कलाकृती विशेष

Uma Devi : बॉलिवूडच्या पहिल्या कॉमेडी क्वीनचं वेदनादायी आयुष्य….

by रसिका शिंदे-पॉल 08/08/2025

प्रेक्षकांना रडवण्यापेक्षा हसवणं फार कठिण असतं… आणि हे कठिण काम गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय चित्रपटसृष्टीतील कॉमेडियन करत आहेत… सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये फक्त पुरुष कॉमेडियन होते…. मात्र, उत्तर प्रदेश मधील एका मुलीने हिंदी चित्रपटसृष्टीत कॉमेडी करायला सुरुवात केली आणि एक नवा इतिहासच रचला… बॉलिवूडच्या या पहिल्या कॉमेडी क्वीनचं नाव आहे उमा देवी… चित्रपटसृष्टीत त्यांना टुनटुन या नावाने ओळखलं जात होतं… आपल्या विनोदी अभिनय शैलीतून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या चुनचुन यांचं वैयक्तिक जीवन फारचं वेदनादायी होतं… दोन-अडीच वर्षांच्या असताना उमा देवी यांच्या आई-वडिल आणि भावाला जमिनीच्या वादात ठार मारलं गेलं… पडद्यावर लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या टुनटुन यांचं जीवन कसं होतं? जाणून घेऊयात…

१९२३ मध्ये उत्तर प्रदेशमधील एका छोट्या गावात जन्मलेल्या उमा देवी यांचं जीवन फार खडतर होतं… अडीच वर्षांच्या असताना नातेवाईकांनी मालमत्तेसाठी आई, वडील आणि भावाची हत्या केली होती. अनाथ झालेल्या टुनटुन नातेवाईकांच्याच घरी मोलकरीण बनून अनेक वर्ष राहिल्या. अत्यंत हलाखीचं आय़ुष्य व्यतीत करणाऱ्या टुनटुन यांना त्यांचे नातेवाईक ज्यांच्या घरी मोलकरणीची गरज वाटायची तिथे पाठवून देत असत… असाच काळ लोटत गेला आणि एक दिवस मात्र टुनटुन यांचं नशीब पालटलं..

वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी उत्तर प्रदेशहून पळ काढत मुंबई गाठली…  गायिका होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या उमा देवी यांनी संघरष केला आणि आपलं गायिका होण्याचं स्वप्न अखेर पुर्ण केलं… मुंबईला आल्यावर उमा देवी सुप्रसिद्ध संगीतकार नौशाद यांना ओळखत होत्या. त्यामुळे त्या थेट त्यांच्या घरी गेल्या. एका महिलेला असे पाहून नौशाद घाबरले. त्यांनी दार उघडताच टुनटुन म्हणजेच उमा देवी यांनी त्यांच्याकडे चित्रपटात गाणी गाण्याची संधी देण्यासाठी हट्ट  करु लागल्या… मात्र, नेमकं काय घडतंय हे लक्षात न आल्यामुळे नौशाद यांनी त्यांची मागणी अमान्य केली, त्यामुळे टुनटुन यांनी त्यांना म्हटलं की, जर तुम्ही मला गाण्याची संधी दिली नाही तर मी आत्महत्या करेन, कारण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही.

================================

हे देखील वाचा : Suresh Wadkar यांनी माधुरी दीक्षितचं लग्नाचं स्थळ नाकारलं होतं?

=================================

टुनटुन यांच्या या वाक्यामुळे नौशाद अस्वस्थ झाले आणि त्यांनी त्यांना गाणं म्हणायला सांगितलं. टुनटुन यांच्या आवाजात गाणं ऐकून नौशाद खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांना गाण्याचा पहिला ब्रेक दिला. टुनटुन यगाणं शिकल्या नव्हत्या, त्यांना फक्त गाण्याची समज होती…  आणि त्यांचा आवाज आणि जिद्द पाहून नौशाद यांनी त्यांना ‘अफसाना लिख ​​रही हूँ दिल बेकरार का’ हे पहिलं गाणं गाण्याची संधी दिली… नंतर त्यांनी ४०-५० गाणी चित्रपटांत गायली…

पुढे, उमा देवी यांचं लग्न झालं आणि इंडस्ट्रीपासून दूर राहून कुटुंबाची जबाबादारी त्या सांभाळू लागल्या. १९५० च्या दशकात नौशाद अली यांनी उमा देवी यांच्यात असलेल्या कॉमेडीचं टायमिंग पाहून त्यांना अभिनय क्षेत्रात जाण्याचं सुचवलं. मग काय पहिला अभिनयाचा ब्रेक त्यांना दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या ‘बाबुल’ चित्रपटात मिळाला आणि त्यांनीच त्यांना चित्रपटात ‘टुनटुन’ हे नाव दिलं.

टुनटुन यांनी त्यानंतर ‘प्यासा’, ‘दिल अपना प्रीत पराई’, ‘एक फुल चार कांटे’, ‘शिकारी’, ‘किस्मत’, ‘सुहागरात’, ‘दुनिया’, ‘हलचल’, ‘गरम मसाला’ अशा अनेक चित्रपटांत कामं केली… हिंदीतील नामवंत दिग्दर्शक विनोदी भूमिकांसाठीच त्यांच्याशी संपर्क साधू लागले. त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवत भारताच्या पहिली महिला विनोदी कलाकार अशी ओळख त्यांनी मिळवली… टुनटुन यांनी ५०-६० च्या दशतकात सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केलं… काही वर्षांनी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर टुनटुन यांच्या चित्रपटांची संख्या जरा कमी होऊ लागली. एक काळ असा होता ज्यावेळी टुनटुन वर्षाला १०१२ चित्रपट करत होत्या त्यांची संख्या आता १-२ वर येऊन ठेपली…

================================

हे देखील वाचा : आधी फ्लॉप नंतर ब्लॉकबस्टर Sholay बद्दल असं का झालं?

=================================

कालांतराने पती काझी यांचं १९९२ मध्ये निधन झाल्यानंतर त्या इंडस्ट्रीपासून अधिकच दुरावल्या… खरं तर पहिली महिला कॉमेडियन अशी ओळख मिळवणाऱ्या या प्रतिभावान अभिनेत्री उमा देवी यांना एवढी यशस्वी कारकीर्द असूनही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही ही खंतच… टुनटुन यांना हसताना बघून त्यांच्या आयुष्यात सारंकाही छान सुरु आहे असं सगळ्यांना वाटायचं. मात्र, निधनाच्या २ दिवस आधी मुंबईत येऊन त्यांनी आपल्या आयुष्याची रहस्य उलगडली होती. चित्रपट समीक्षक आणि इतिहासकार शिशिर कृष्ण शर्मा यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी लहानपणी आई-वडिल-भाऊ यांची कशी हत्या झाली होती आणि बालपण कसं होतं याचा खुसाला केला होता.. आणि  या मुलाखतीनंतर दोन दिवसांनी टुनटुन यांचे निधन झालं होतं असं सांगिलतं जातं…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood first female comedian bollywood movies bollywood update Celebrity Celebrity News Dilip kumar Entertainment Entertainment News Indian Cinema pyasa movie uma devi movies uma devi tun tun untold stories of uma devi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.