Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….

Prajakta Gaikwad चा साखरपुडा संपन्न; नवऱ्याच्या नावाशी आहे खास कनेक्शन !
मराठी टेलिव्हिजनवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महाराणी येसूबाईंची दमदार भूमिका साकारणारी आणि घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. तिच्या लग्नाविषयीच्या चर्चा बराच काळ सुरू होत्या. “ठरलं!” असा छोटासा पण अर्थपूर्ण शब्द वापरत तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून चाहत्यांना लग्नाची गोड बातमी दिली होती. त्यानंतर सर्वांच्याच मनात प्रश्न होते. प्राजक्ताचा होणारा नवरा कोण आहे? आणि लग्न केव्हा आहे?(Prajakta Gaikwad Engagement)

दरम्यान, तिने लग्नाआधीचा एक महत्त्वाचा टप्पा पार करत साखरपुड्याची खुशखबर चाहत्यांना दिली. ७ ऑगस्ट रोजी प्राजक्ताचा साखरपुडा सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झळकताच चाहते आणि सहकलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. सर्वात मोठं म्हणजे, याच फोटोंमधून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा पहिल्यांदा चाहत्यांसमोर आला आणि त्याचे नावही उघड झाले.

प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव ‘शंभुराज’ असल्याचे समजताच चाहत्यांना हा एक गोड योगायोग वाटला. कारण मालिकेत प्राजक्ताने साकारलेली येसूबाई ही छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी होती. मालिकेत ज्याचे नाव संभाजी आणि वास्तवात होणाऱ्या नवऱ्याचे नाव ‘शंभुराज’च आहे. हा साजेसा संयोग चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला. याआधी प्राजक्ताच्या मेंदी सोहळ्यात तिने हातावर ‘SP’ अशी आद्यक्षरे काढलेली दिसली होती. तेव्हाच S कोण, याची उत्सुकता वाढली होती.(Prajakta Gaikwad Engagement)
===================================
===================================
साखरपुडा सोहळ्यात प्राजक्ताने परिधान केलेला पारंपरिक शाही लूक सर्वांच्या मनाला भावला. सुवर्ण अलंकार, सुंदर नऊवारी साडी आणि डोक्यावरची फुलांची सजावट तिच्या रूपात चार चाँद लावत होती. शंभुराज यांचाही पारंपरिक पोशाख आणि आत्मविश्वासपूर्ण उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. दोघांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि प्रेम या सोहळ्याला खास बनवत होता. या नव्या प्रवासासाठी प्राजक्ता आणि शंभुराज यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची आणि सिनेविश्वातील मित्रांची सोशल मीडियावर अक्षरशः रांग लागली आहे. आता सर्वांच्या नजरा त्यांच्या लग्नसोहळ्याकडे लागल्या आहेत, जो लवकरच पार पडणार आहे.