‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Sonalee Kulkarni : ‘ती मिठी आणि तिचे कौतुकाचे शब्द…’; सोनालीने शेअर केला ‘तो’ व्हिडिओ
पद्मश्री काजोल हिला नुकताच ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात स्व.राज कपूर यांच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यात आला… यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने काजोलची सिनेकारकिर्द नृत्य स्वरुपात सादर केली… तिच्या या धमाल डान्स परफॉर्मन्सनंतर काजोल हिने सोनालीला घट्ट मिठी मारत तिचं कौतुक केलं… हा खास क्षण सोनाली कुलकर्णी हिने शब्दांत मांडत एका पोस्टद्वारे सोशल मिडियावर शेअर केला आहे… नेमकं काय म्हणाली सोनाली जाणून घेऊयात..(Entertainment News)

सोनाली कुलकर्णीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “लहानपणापासूनच काजोलची मोठी चाहती आहे. तिच्यासाठी, तिच्यासमोर आणि तिच्या गाण्यावर नृत्य सादरीकरण करणं ही गोष्ट खूप कमाल आहे…”. सादरीकरणानंतर काजोलची भेटही घेतली. तिने त्यांच्या गळाभेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सोनालीने पुढे लिहिले की, ‘…आणि हे घडलं! काजोलची मी अगदी लहानपणापासूनच मोठी चाहती आहे. ‘मेरे ख्वाबों में जो आए’सारख्या तिच्या सगळ्या गाण्यांवर आरशासमोर थिरकत राहिलीये… परवा महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कार सोहळ्यात तिच्यासमोर, तिच्यासाठी सादरीकरण करण्याची संधी मिळाली. ही इतकी कमाल गोष्ट आहे माझ्यासाठी, जी खरंतर मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तिच्या निखळ अभिनयाने, स्वच्छंदी स्वभावाने आणि ऑनस्क्रिन-ऑफस्क्रिन असलेल्या जिवंतपणाने, बिनधास्तपणे जगण्याच्या वृत्तीने, निरागस आणि Childlike Sparkle ने कायमच मला भुरळ घातली आहे.’
पुढे सोनाली असं लिहिते, ‘त्यात सादरीकरणानंतर मिळालेल्या तिच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल काय म्हणावे… एका सच्च्या कलाकाराने एका कलाकाराचे असे कौतुक करावे, हे एका उत्तम माणसाचे आणि रसिक असण्याचे चिन्ह. ती मिठी आणि तिचे कौतुकाचे शब्द कायम स्मरणात राहतील.’
================================
हे देखील वाचा : Karisma Kapoor : बबिता कपूरमुळे करिश्मा कपूरच्या पायाला झालेली दुखापत?
=================================
या पोस्टच्या शेवटी सोनालीने लिहिले की, ‘याआधी श्रीदेवी आणि लता मंगेशकर यांना मानवंदना देण्याची संधी मिळाली होती, पण त्या नसताना… पण या वेळी काजोलच्या वाढदिवशी तिच्या गाण्यांवर, तिच्या समोर लाइव्ह नाचता येणे, ही एका प्रामाणिक फॅनकडून तिच्या सुपरस्टारला छोटीशी भेट आहे.’ मुख्यमंत्री आणि कार्यक्रमाशी संबंधित सर्वांचे आभारही तिने या पोस्टमधून मानले. दरम्यान, सोनाली कुलकर्णी हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती ‘परिणती’ या चित्रपटातून अमृता सुभाष हिच्या सोबत स्क्रिन शेअर करणार आहे…(Marathi Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi