Prarthana Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

Ramayana मध्ये आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री; साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सगळे आवर्जून वाट पाहात आहेत… या चित्रपटात रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत… तसेच, दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाची भूमिका साकारणार आहे… आता बॉलिवूडच्या भव्य बिग बजेट चित्रपटात छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्याची वर्णी लागली असून यात तो रावणाच्या एका जवळच्या व्यक्तीचं काम करणार आहे… कोण आहे तो अभिनेता जाणून घेऊयात…

तर, रामायण चित्रपटात अभिनेता चेतन हंसराजची या चित्रपटात एन्ट्री झाली आहे. नुकतेच त्याने चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, तो ‘रामायण’ मध्ये रावणाचे आजोबा सुमालीची भूमिका साकारणार आहे. इतंच नाही तर त्याने असं देखील सांगितलं की, या चित्रपटाची कथा त्याच्या व्यक्तिरेखेपासून सुरू होते.
मिनिट्स ऑफ मसालाशी बोलताना चेतन हंसराज म्हणाला की, ”मी नुकतेच रणबीर आणि यश अभिनीत ‘रामायण’चे शूटिंग पूर्ण केले आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम प्रोजेक्टपैकी एक आहे. त्याची पातळी, शूटिंगचा अनुभव, हॉलिवूडची टीम, सगळंच सर्वोत्तम होते. हा अनुभव अविश्वसनीय होता.’ ‘ चेतनने सुमालीची त्याची भूमिका चित्रपटासाठी खूप महत्त्वाची असल्याचे वर्णन केले.

पुढे तो असं देखील म्हणाला की, ”सेटवर उपस्थित असलेले अनुभवी हॉलिवूड तंत्रज्ञही चित्रपटाचा आकार पाहून चकित झाले. मी चित्रपटात रावणच्या आजोबाची भूमिका केली आहे. ही खूप महत्त्वाची भूमिका आहे, कथा त्याच्यापासून सुरू होते. मी जास्त काही सांगू शकत नाही, पण हे आतापर्यंतचे सर्वात नेत्रदीपक शूटिंग आहे. मी यापूर्वी कधीही असे काही पाहिले नव्हते. हॉलिवूडहून आलेले लोकही म्हणू लागले की बॉस, हे काहीतरी वेगळेच आहे.”
================================
=================================
दरम्यान, ‘रामायण’चं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं असून चित्रपटात साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत, लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत, रवी दुबे लक्ष्मणच्या भूमिकेत आणि अरुण गोविल दशरथा यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय, चित्रपटात अजून बरेच कलाकार असणार आहेत.. शिवाय, निर्मात्यांनी सांगितल्यानुसार बॉलिवूडमधील हा सर्वात मोठा बिग बजेट चित्रपट असून दोन भागांमध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचं बजेट जवळपास ४००० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi