Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Aranya : ‘अरण्य’मध्ये उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी
घनदाट जंगल आणि तेथे वास्तव्य करणाऱ्या प्राण्यांचं आयुष्य कसं असतं? त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष कसा असतो? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते… आता लवकरच ‘अरण्य’ या चित्रपटातून जंगलाची गोष्ट उलगडणार आहे…एस एस स्टुडिओ निर्मित ‘अरण्य’ या चित्रपटाचे दमदार मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
‘अरण्य’च्या मोशन पोस्टरमध्ये जंगलाची दाट हिरवाई, धुक्याने व्यापलेले दृश्य आणि त्यात लपलेला गूढपणा अंगावर काटा आणणारा आहे. यातील हार्दिक जोशीचा लूक विशेष लक्ष वेधून घेतो. डोळ्यांमध्ये प्रखर राग आणि निर्धार, चेहरा कपड्याने झाकलेला आणि पार्श्वभूमीला जंगलातील गूढ वातावरण. त्याच्या नजरेतून एक भयंकर संघर्ष आणि दडलेली कहाणी जाणवते.

या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘अरण्य’ ही फक्त जंगलाची कथा नाही, तर ही मानवी अस्तित्व, निसर्गाशी असलेलं आपलं नातं आणि संघर्षाच्या काठावर उभ्या राहिलेल्या माणसाची कहाणी आहे. या अरण्यात फक्त झाडं, पाने किंवा वेली नाहीत, तर येथे श्वास घेणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक इतिहास आहे. कधी शांत, कधी रक्तरंजित. मला हवं होतं की प्रेक्षकांनी या जंगलाचा गंध, त्यातील ओलसरपणा, आणि त्याच्या प्रत्येक सावलीतील रहस्य अनुभवावं. ‘अरण्य’ प्रेक्षकांना आतून जगायला लावेल.’’
================================
=================================
दरम्यान, ‘अरण्य’ चित्रपटाची निर्मीती शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी केली असून लेखक व दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे आहेत. हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा आणि चेतन चावडा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा भव्य प्रवास १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi