Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Baaghi 4 : टायगर श्रॉफच्या चित्रपटाचा टीझर रिलीज; हा अभिनेता साकारणार खलनायक…
अभिनेता टायगर श्रॉफ याची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘बागी ४’ (Baaghi 4) चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे… अॅनिमल चित्रपटाप्रमाणे रक्तबंबाळ असा चित्रपटाचा टीझर असून या चौथ्या भागात अपेक्षेपेक्षा अधिक Violence दिसणार आहे… शिवाय, पुन्हा एकदा संजय दत्त एका अनोख्या भूमिकेत दिसणार असून टायगर आणि संजय एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत…(Entertainment News)

‘बागी ४’ चित्रपटाच्या टीझरमध्ये टायगर श्रॉफ (Tiger Shroff), संजय दत्त, हरनाज संधू आणि सोनम बवेजा यांचा खतरनाक लूक दिसतो… या चित्रपटात टायगर आणि संजय दत्त यांच्या भूमिका फारच डार्क असून यात रक्तरंजित अॅक्शन सीन्स देखील पाहायला मिळत आहे. बरं, चित्रपटात केवळ संजय दत्त आणि टायगरचं नाही तर सोनम बाजवा आणि हरनाज कौर संधू देखील अॅक्शन सीन्स करताना दिसत आहेत.. दरम्यान, या चित्रपटात आपल्या प्रेमासाठी प्रियकर फारच आक्रमक झालेला पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहे… शिवाय, खलनायक संजय दत्त (Sanjay Dutt) याचा खास अंदाज पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षक अधिक उत्सुक आहेत यात शंकाच नाही…
================================
=================================
२०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘बागी’ चित्रपटाचा हा सीक्वेल असून टीझरवर लोकांनी खास कमेंट्स केल्या आहेत… प्रेक्षकांनी आता हिंदीतला आणखी एक सुपरहिट चित्रपट ‘बागी ४’ असेल अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.. त्यामुळे आता खरंच बागी ४ हिट असेल की फ्लॉप हे येणारा काळच सांगेल… दरम्यान, ‘बागी ४’ ची निर्मिती साजिद नादियाडवाला यांनी केली असून ए हर्ष यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. टायगर श्रॉफच्या चित्रपटाच्या टीझरला सीबीएफसीकडून ए सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. चित्रपटात अॅक्शन सीन्ससोबत प्रेमकथा देखील पाहायला मिळणार आहे… दरम्यान, ‘बागी ४’ आधी टागर याने रोहित शेट्टी यांच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात काम केलं होतं…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi