Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Coolie : रजनीकांत ते आमिर खान; कलाकारांचं मानधन आहे तरी किती?
सगळीकडे सध्या सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कुली’ (Coolie Movie) चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे… रजनीकांत यांची सिनेकारकिर्द लवकरच ५० वर्षांची होत असून कुली हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांनी विशेष आहे… १४ ऑगस्ट २०२५ रोजी कुली देशभरात रिलीज होणार असून पॅन इंडिया असणाऱ्या या चित्रपटात ५ चित्रपटसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार आहेत… चला तर मग जाणून घेऊयात ३५० कोटींचं बजेट असणाऱ्या ‘कुली’ चित्रपटातील कलाकारांना किती मानधन मिळालं आहे? (Tamil movies)

तर, ‘कुली’ या तमिळ चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केलं आहे… विशेष म्हणजे या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच जगभरात ५५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान,अशी माहिती समोर येत आहे की, रजनीकांत (Rajinikanth) यांना या चित्रपटासाठी २०० कोटी रुपये मानधन देण्यात आलं असून दिग्दर्शक लोकेश कनागराज यांना ५० कोटी रुपये मानधन मिळालं आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला ५० कोटींचं मानधन देण्यात आलं आहे…

याशिवाय, चित्रपटाचं संगीत देणाऱ्या अनिरुद्धला १५ कोटी रुपये, तेलुगु स्टार नागार्जुन यांना १० कोटी, सत्यराज यांना ५ कोटी, उपेंद्र आणि श्रुती हासन यांनी प्रत्येकी ४ कोटी मानधन दिले आहे… तर, पूजा हेगडेला ३ कोटी आणि सौबिन शाहिरला १ कोटी रुपये मानधन देण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत.
================================
हे देखील वाचा : Rajinikanth : ५ इंडस्ट्रीचे ५ दिग्गज एकत्र… ‘कुली’ १००० कोटी कमावणार?
=================================
दरम्यान, रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीत ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. आजवर रजनीकांत यांचे प्रत्येक चित्रपट हिट झाले आहेतच; परंतु १००० कोटींचा टप्पा कोणत्याही चित्रपटाने पार न केल्यामुळे ‘कुली’ चित्रपटाकडून प्रत्येकाला फार अपेक्षा आहेत… या चित्रपटाने तिकीट बुकिंगमध्ये २०० कोटींचा टप्पा पार केला आहे… त्यामुळे आता १४ ऑगस्ट २०२५ ची वाट संपूर्ण देश पाहात आहे यात शंकाच नाही…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi