Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

अभिनेता शरद केळकरच्या Tum Se Tum Tak मालिकेविरोधात FIR; तक्रारदाराला लादी पुसण्याचे आदेश देणार?
झी टीव्हीवरील अभिनेता शरद केळकरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तुम से तुम तक’ या मालिकेविरोधात दाखल झालेला एफआयआर रद्द करण्यासाठी वाहिनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केवळ तक्रारदाराच्या आक्षेपांवरच नव्हे, तर त्याच्या वर्तनावरही तीव्र प्रश्न उपस्थित केले. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली.(Tum Se Tum Tak Serial Case)

या मालिकेत ४६ वर्षीय पुरुष आणि १९ वर्षीय तरुणी यांच्यातील प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. तक्रारदार सुनील शर्मा यांनी, या कथेमुळे त्यांची भावना दुखावल्याचा दावा करत पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर झी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, झी टीव्हीने हा गुन्हा रद्द करण्याची विनंती हायकोर्टात केली. सुनावणीदरम्यान खंडपीठाने थेट विचारले की, “या कथेत आक्षेपार्ह नेमकं काय आहे? ४६ वर्षीय नायक १९ वर्षीय तरुणीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे भावना दुखावतात? असे आक्षेप तुम्ही स्वतःजवळच ठेवा.”

न्यायालयाचे लक्ष तक्रारदाराच्या ओळखीत असलेल्या विसंगतीकडे गेले आहे. सायबर सेलसमोर त्याने स्वतःचे नाव ‘सुनील शर्मा’ असे दिले होते. मात्र, कोर्टात हजर झाल्यावर त्याने ‘सुनील महेंद्र शर्मा’ असे नाव सांगितले. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, त्याच्या आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रांवर त्याचे नाव ‘महेंद्र संजय शर्मा’ असल्याचे दिसून आले. या विसंगतीवर न्यायालयाने स्पष्ट नाराजी व्यक्त केली.(Tum Se Tum Tak Serial Case)
===============================
हे देखील वाचा: ‘सध्याच्या काळात मूलं जन्माला घालूच नये’ प्रसिद्ध अभिनेत्रीच धक्कादायक वक्तव्य !
===============================
महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सुचवले की, तक्रारदाराला किमान एक महिना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात साफसफाईचे काम करण्याचे आदेश द्यावेत, ज्यायोगे त्याला आपल्या वर्तनाचे परिणाम समजतील. खंडपीठाने या सूचनेवर सकारात्मक प्रतिसाद देत, असे निर्देश दिले जाऊ शकतात, असे स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणामुळे ‘तुम से तुम तक’ मालिका वरील तक्रारीची विश्वसनीयता आणि तक्रारदाराच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता न्यायालयाचा अंतिम आदेश काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.