Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Johny Lever : धारावी ते बॉलिवूड इंडस्ट्री प्रवास करणारं हसरं व्यक्तिमत्तव…!
४१ वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा एक विनोदी अभिनेता… ज्याचं खरं तर बालपण फार हलाखीत गेलं… वडिलांना दारुचं व्यसन, घरात पैशांची कुणकुण अशा बिकट परिस्थितीवर मात करुन या अभिनेत्याने संपूर्ण बॉलिवूडला आपल्या अभिनयाची दखल घेण्यास भाग पाडलं… ते विनोदी अभिनेते म्हणजे जॉनी लिव्हर… ३५० पेक्षा अधिक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये कामं केलेल्या जॉनी लिव्हर यांनी अतिशय कष्टाने इंडस्ट्रीत आपली कधीच न मिटणारी ओळख निर्माण केली आहे… आज त्यांच्या वाढदिवशी जाणून घेऊयात त्यांचा प्रवास…(Entertainment News)

जॉनी लिव्हर यांचा जन्म एका तेलुगू ख्रिश्चन कुटुंबात झाला… मुंबईच्या धारावीत ते लहानाचे मोठे झाले… वडिलांना व्यसन असल्यामुळे घराची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर होती.. जॉनी यांना ३ बहिणी आणि १ भाऊ… घर चालवण्यासाठी जॉनी लिव्हर यांनी समोर येईल ते काम केलं… घरातील परिस्थितीमुळे त्यांना ७वी नंतर शिक्षण घेता आलं नाही… पण जगाच्या शाळेने मात्र त्यांना खुप काही शिकवलं… देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केलं, फडकी मारली, ग्लास धुतले, मुंबईच्या रस्त्यांवर उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या. त्यानंतर बसस्टँडवर फेरीवाला म्हणूनही काम करू लागले आणि तिथे बॉलिवूड अभिनेत्यांची नक्कल करत पैसे कमावले… त्यानंतर १८व्या वर्षी जॉनी हिंदुस्थान युनीलिव्हर या कंपनीत कामाला लागले. १०वी देखील पूर्ण नसल्यामुळे स्वीपरचे काम त्यांना मिळालं आणि तिथे कंपनीत ते झाडू मारणे फरशा पुसणे अशी कामं करायला लागले…

जॉनी लिव्हर यांचं खरं नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे… पण त्यांना जॉनी लिव्हर हे नाव मिळण्याचाही एक खास किस्सा आहे… तर जॉनी हिंदुस्थान युनीलिव्हर कंपनीतत कामाला असताना दुपारच्या वेळात कलाकारांच्या किंवा काहीही नकला करून ते मित्रांना हसवायचे. मग कंपनीतील साहेबांची नक्कल करून ते सहका-यांचे मनोरंजनही करायचे. एकदा युनियनचे लीडर सुरेश भोसले यांच्या लक्षात आले आणि ‘अरे याने तर लिव्हरचा बॅण्ड वाजवला, आजपासून याला जॉनी नाही, जॉनी लिव्हर म्हणायचं.’ आणि त्या दिवशी संध्याकाळच्या एका कार्यक्रमात जॉनी यांनी स्वतःची ओळख जॉनी लिव्हर अशी करून दिली व तेव्हापासून त्यांचे जॉनी लिव्हर असे नाव पडले.

जॉनी लिव्हर यांनी कधीच प्रमुख भूमिका साकारली नाही, परंतु प्रत्येक लीड हिरो सोबत त्यांनी आपली सहाय्यक भूमिका चांगलीच वाजवली… जॉनी यांना त्यांचा पहिला ब्रेक अभिनेते सुनील दत्त यांनी दिला होता… झालं असं की १९८१ मध्ये त्यांनी युनिलिव्हरमधील नोकरी सोडली आणि स्टेज शोवर लक्ष केंद्रित केलं. पुढे नशीबाने त्यांना महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत १९८२ मध्ये वर्ल्ड टूर करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्यासोबत जॉनी यांनी पहिल्यांदात अमेरिका पाहिली… कालांतराने सुनील दत्त यांनी एका शोमध्ये त्यांचा अभिनय पाहिला आणि त्यांना त्यांच्या ‘दर्द का रिश्ता’ चित्रपटात काम दिले. आणि तिथूनच त्यांच्या अभिनयाचा श्रीगणेशा झाला… आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही…(Bollywood latest news)

जॉनी यांनी एकदा एका मुलाखतीमध्ये मुंबईतील कुख्यात गुंड हाजी मस्तान आणि वरदराजन यांच्याबद्दल सांगितलं होतं की, “आम्ही त्यांना लहानपणापासून ओळखतो, आम्ही त्यांना जवळून पाहिलंही आहे. जेव्हा हाजी मस्तान यायचे तेव्हा लोकं गर्दी करायचे, खरं कर लोकं त्यांचा खूप आदर करायची.” पुढे त्यांना “हाजी मस्तान आणि वरदराजनची भीती वाटत नव्हती का?”, असं विचारलं असता जॉनी हसून म्हणाले की, “नाही, आम्हाला ते खूप आवडायचे. ते म्हणायचे, ‘ये मेरा बच्चा है, बेटा है.” त्या मुलाखतीमध्ये जॉनी असं देखी म्हणाले होते की जर ते अभिनय क्षेत्रात अभिनेता नसते तर कदाचित ज्या वस्तीत ते लहानाचे मोठे झाले त्यानुसार ते कदाचित गुंड झाले असते.
================================
हे देखील वाचा : ‘साधना’ चित्रपटासाठी Vyjayanthimala यांनी रात्री १२ वाजता सही का केली होती?
=================================
जॉनी लिव्हर यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल तर ‘तेजाब’, ‘बाजीगर’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘येस बॉस’, ‘जुदाई’, ‘हम आपके दिल में रेहते है’, ‘कहो ना प्यार है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘राजु चाचा’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘खुशी’, ‘हेरा फेरी’, ‘गोलमाल’, ‘हाऊसफुल्ल’, ‘कुली नंबर १’, अशा ३५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये कामं केली…. लवकरच ते ‘वेलकम टु द जंगल’ या चित्रपटातही दिसणार आहेत… जवळपास ४१ वर्ष इंडस्ट्रीत काम करणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील हसण्याचं कारण असणाऱ्या जॉनी लिव्हर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!(Johny Lever movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi