Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Kurla to Vengurla Teaser: प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर आणि वैभव मांगले उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट!
गावांतील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय घेऊन माती आणि नाती जोडणारी एक धमाल गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झाला असून सध्या चित्रपटसृष्टीत या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. विजय कलमकर दिग्दर्शित हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.(Kurla to Vengurla Teaser)

सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि ऑरा प्रोडक्शन्स यांच्या संयुक्त निर्मितीतून साकारलेला हा चित्रपट अमरजित आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे आणि एम. व्ही. शरतचंद्र यांनी निर्माण केला आहे. कथा, पटकथा आणि संवादलेखनाची जबाबदारी अमरजित आमले यांनी सांभाळली असून दिग्दर्शन विजय कलमकर यांचे आहे.

अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर आणि वैभव मांगले प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत, तर सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर आणि साईंकित कामत अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात दिसणार आहे. रंगनाथ बाबू गोगीनेनी (छायांकन), विजय कलमकर (संकलन), अविनाश सोनावणे (ध्वनिआरेखन), चंचल काळे आणि अमरजित आमले (गीतलेखन), अक्षय खोत (संगीत दिग्दर्शन आणि पार्श्वसंगीत) यांनी आपापली जबाबदारी पार पाडली आहे. वितरणाची धुरा पिकल एंटरटेनमेंट कडे आहे.(Kurla to Vengurla Teaser)
=============================
==============================
देश झपाट्याने विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना शहरे आणि ग्रामीण भाग यांच्यात एक अदृश्य दरी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील मुलांची लग्ने रखडण्यामागे मुलींच्या वाढत्या आकांक्षा आणि इतर सामाजिक कारणे आहेत. हा प्रश्न फक्त गावांपुरता मर्यादित न राहता शहरांतही वाढता आहे. या गंभीर सामाजिक प्रश्नाला विनोदी आणि मनोरंजक पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न “कुर्ला टू वेंगुर्ला” मध्ये करण्यात आला आहे. कोकणातील निसर्गरम्य पार्श्वभूमी आणि इरसाल स्वभावाची माणसे या कथेला अधिक रंगत आणतात, हे टीझरमधून स्पष्ट होते. माती आणि नाती जोडणारा, प्रत्येक कुटुंबाशी नाते सांगणारा हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना भावणार आहे. मात्र, त्यासाठी १९ सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.