“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

Gharoghari Matichya Chuli मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर करणार मोठा डाव !
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेत रणदिवे कुटुंबातील संघर्ष, कट-कारस्थान आणि भावनिक चढ-उतार दाखवले जात आहेत. विशेष म्हणजे, या मालिकेतील ऐश्वर्या हे पात्र सतत रणदिवे कुटुंबाला त्रास देत आले आहे. तिच्या प्रत्येक डावामुळे कुटुंबात तणाव निर्माण झाला आहे. ऐश्वर्या आपल्या नवऱ्या सारंगला सोबत घेऊन जानकी आणि ऋषिकेश विरोधात कट-कारस्थान रचत आली. इतकेच नाही तर, अनेक वेळा ऐश्वर्याने जानकी आणि ऋषिकेशचा जीव घेण्याचाही प्रयत्न केला. त्यातही अपयश आल्यावर तिने घरातील सदस्यांमध्ये फूट पाडण्याचा, जानकी आणि ऋषिकेशला कुटुंबापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता परिस्थिती पालटणार आहे.(Gharoghari Matichya Chuli Serial)

सारंगसमोर अखेर ऐश्वर्याचा खरा चेहरा आला आहे. यानंतर सारंगने जानकी आणि ऋषिकेशची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. रणदिवे कुटुंबाच्या हितासाठी त्याने ऐश्वर्याला तिच्याच जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन आखला आहे. योजनेप्रमाणे, जानकी आणि ऋषिकेशने सारंगचा मृत्यू खोटा-खोटा दाखवून ऐश्वर्याला धक्का दिला आहे. या खेळामध्ये ऐश्वर्या स्वतःच आपल्या कटकारस्थानात फसणार आहे. नुकताच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने मालिकेचा ताजा प्रोमो शेअर केला असून, त्यात सारंग नवा वळण आणतो. रूप बदलून घरी परतताना तो मनाशी म्हणतो की, “मी जिवंत आहे हे आईला सांगायला हवं.” त्याचवेळी जानकीला सारंग दिसतो आणि ऐश्वर्या ओळखू नये म्हणून ती सारंगला सावध करते. नंतर सारंग आईच्या खोलीत जाऊन खोटी दाढी-मिश्या काढतो आणि सत्य उघड करत आईला सांगतो की तो जिवंत आहे.

यानंतर मालिकेत अजून मोठा टर्निंग पॉईंट येतो. जानकी सर्वांना म्हणते की, “मला खात्री आहे की आई आपल्याला समजून घेतील.” तेवढ्यात हृषीकेशची आई तिथे येते आणि स्पष्ट सांगते की, “जानकी, मी आता फक्त समजून घेणार नाही, तर तुमच्या योजनेत सामीलही होणार.” हे ऐकल्यानंतर जानकीचे डोळे पाणावतात आणि ती म्हणते, “आईंची साथ म्हणजे ऐश्वर्यावर मात झालीच समजा.”(Gharoghari Matichya Chuli Serial)
===============================
हे देखील वाचा: Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!
================================
स्टार प्रवाहने हा प्रोमो शेअर करत “संपूर्ण रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर मात करण्यासाठी एकत्र येणार…” असं कॅप्शन दिलं आहे त्यामुळे आता मालिकेत ऐश्वर्याच्या दादागिरीचा शेवट कसा होणार, रणदिवे कुटुंब कशा प्रकारे तिला तिच्याच कारस्थानात फसवणार, याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.