
वरण-भात, कढीला ‘गरिबांचं जेवण’ म्हणणाऱ्या Vivek Agnihotri ला मराठी अभिनेत्रीने सुनावले खडे बोल
अभिनेत्री पल्लवी जोशी आणि तिचे पती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या त्यांच्या बंगाल फाईल्स चित्रपटासोबतच मराठी खाद्य संस्कृतीवर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विशेष चर्चेत आहेत… मराठी जेवण गरीबांसारखं असतं असं विवेक यांनी म्हटलं असून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे… अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने विवेक अग्निहोत्री यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.. ही अभिनेत्री कोण आहे आणि तिने काय म्हटलं आहे चला तर जाणून घेऊयात…(Vivek Gnihotri News)

‘कर्ली टेल्स’च्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री हे मराठी लोकांचं जेवण म्हणजे ‘गरिबांचं जेवण’ असं म्हणाले. वरण-भात, कढी याला त्यांनी नावं ठेवली. यावरुन मराठमोळी अभिनेत्री नेहा शितोळे हिनंही आपली प्रतिक्रिया दिली आहे. नेहानं सोशल मीडियावर पोस्ट करुन संताप व्यक्त केला आहे. हा माणूस ‘गरिबांचं’ किंवा ‘किसानांचं’ जेवण म्हणजे, वाईट असं म्हणून अन्नाचा, शेतकऱ्यांचा आणि भारताची जवळ जवळ २५ टक्के जनता जी दारिद्र्य रेषेखाली राहते, त्यांचा अपमान करतोय, असं नेहा शितोळे म्हणाली आहे. (Entertainment News)
नेहा शितोळे (Neha Shitole) पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली?
१. मराठी जेवणाविषयी पर्यायाने संस्कृती विषयी वाट्टेल ते बोलतोय हा माणूस… पुढे अजुन एका रील मधे हा म्हणतोय की मी सात्विक अन्न खातो… (Plant based food) (ह्याला सावजी खायला घाला आणि तांबडा पांढरा रस्सा पाजा एकदा)
२. आपल्या सगळ्यांची लाडकी पल्लवी जोशी हसून हसून हा विनोद अभिमानाने सांगते आहे… आणि मुळात आम्ही भाज्या फक्त उकडत नाही… उकडीचे मोदक सिंपल नाहीत… पुरणपोळी सिंपल नाही…
३. ज्यांच्या घरी असं जेवण जेवतात, अश्या मुलीशी कसं लग्न करायचं हा विवेक अग्निहोत्री ला पडलेला प्रश्न आहे…
४. आणि हे सगळं YouTube च्या माध्यमातून करोडो लोकं बघतायत…

“हा माणूस काश्मीरचं सत्य आपल्या समोर आणतो आहे म्हणून आपण ह्याला डोक्यावर घ्यायचं? ज्या माणसाच्या मनात मुळात इतका भेदभाव आणि चुकीच्या धारणा आहेत भारतातल्या एका राज्याबद्दल, तिथे राहणाऱ्या आणि कष्ट करून कमावून खाणाऱ्या लोकांबद्दल तो काय दुसऱ्या राज्याचं सत्य सांगणार आपल्याला??? आता मराठीचा झेंडा मिरवणाऱ्या सगळ्यांनी ह्याचे सिनेमे Boycott करायला नकोत का? जसा स्टँड अप कॉमेडियन लोकांना “धडा शिकवण्याचा” आपण प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाल्याची पण ग्वाही दिली तसा आता ह्यांना कोण शिकवणार “वरण भाताची” किंमत आणि महत्त्व???”
================================
हे देखील वाचा : ‘मराठी लोकांचे वरण-भात म्हणजे गरिबांचं जेवण…’; काय बोलून गेले Vivek Agnihotri
=================================
“ह्या आणि अशा लोकांमुळे खरंतर मराठी भाषेला, माणसाला आणि पर्यायाने संस्कृतीला धोका आहे कारण हे पॉवर पोझिशन मध्ये बसून मराठी लोकांविषयी, भाषेविषयी वाईट, निंदनीय आणि अपमानकारक वक्तव्य करतात… त्यामुळे नाही म्हणलं तरी अनेक स्तरांवर लोकांच्या मनात कळत नकळत परिणाम होतो आणि आपण वरवर च्याच गोष्टी (theatre मिळत नाही, मराठी अनिवार्य नाही, मराठी कंटेंट OTT स्वीकारत नाही… इत्यादी) साठी भांडत बसतो… का भीती वाटते आपल्याला आपल्यापेक्षा जास्त मोठ्या माणसाशी पंगा घ्यायची… त्यापेक्षा दुकानदारांना, कष्ट करून जगणाऱ्या गरीब परप्रांतियांना धमकावणं आणि मारणं सोपं आहे नाही का??”, असं नेहा शितोळे म्हणाली आहे… आता यावर विवेक अग्निहोत्री किंवा पल्लवी जोशी काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi