
War 2 : ह्रतिक रोशन आणि ज्यु.एनटीआर यांच्या चित्रपटाची ३०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री!
ह्रतिक रोशन, ज्युनिअर एनटीआर आणि कियारा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘वॉर २’ (War 2 movie) चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झाला.. बरं याच दिवशी सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या ‘कुली’ (Coolie) चित्रपटालाही ‘वॉर २’ ने तगडी टक्कर दिली आहे… आता बॉक्स ऑफिसवर वॉर २ ची नेमकी कमाई किती झाली आहे जरा जाणून घेऊयात…(War 2 movie)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘वॉर २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ५२ कोटी, दुसऱ्या दिवशी ५७.३५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३३.२५ कोटी, चौथ्या दिवशी ३१.१५ कोटी, पाचव्या दिवशी ८.५ कोटी, सहाव्या दिवशी आत्तापर्यंत १.७३ कोटी कमावले असून चित्रपटाने एकूण कमाई १८४.९८ कोटी कमावले आहेत… तसेच, ग्लोबली वॉर २ चित्रपटाने ३०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे… या आधी रिलीज झालेल्या चित्रपटाच्या पहिल्या भागाने अर्थात वॉर चित्रपटाने ३०३.३४ कोटी कमावले होते… याशिवाय ह्रतिक रोशनच्या इतर चित्रपटांनी आजवर २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.. त्यामुळे आता ‘वॉर २’ चित्रपट ५०० कोटींचा टप्पा पार करमार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…(War 2 box office collection)
================================
हे देखील वाचा : Saiyaara : बॉक्स ऑफिसवर ‘सैयारा’ची जोरदार बॅटिंग ४ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!
=================================
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’ हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्समधला (Spy Universe) चित्रपट असून या युनिवर्सची सुरुवात सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या ‘एक था टायगर’ (Ek Tha Tiger) चित्रपटाने ही सुरुवात झाली होती… आणि आता लवकरच या स्पाय युनिवर्समधला अल्फा हा पहिला फिमेल स्पाय चित्रपट येणार असून यात आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत दिसणार आहे…(Bollywood movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi