
Stree to Thama : बॉलिवूडचं हॉरर-कॉमेडी युनिवर्स!
प्रेक्षकांना खरं तर कधी कुठल्या पठडीतील चित्रपट आवडतील याचा काही अंदाज नाही… बायोपिक्स, ऐतिहासिक, प्रेमकथा या चित्रपटांचा एक काळ होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही… आणि आता अलीकडे प्रेक्षक कंटेन्टच्या बाबतीत फार पर्टिक्युलर झाले आहेत… त्यांना काहीही दाखवून चालत ही कारण जगभरातील विविध भाषांमधील चित्रपट, सीरीज ते पाहात असल्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा आवाका वाढला आहे… त्यामुले सध्या प्रेक्षकांना थ्रिलर किंवा हॉरर-कॉमेडी (Horror Comedy Movies) चित्रपट अधिक पाहायला आवडत आहेत… याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘भेडिया’, ‘स्त्री’ आणि आता येऊ घातलेला ‘थामा’ (Thama Movie) चित्रपट…(Bollywood News)

बॉलिवूडमध्ये या आधी हॉरर कॉमेडी चित्रपट आले नव्हते का? तर नाही, ‘भूल-भुलैय्या’, ‘गॅग ऑफ घोस्ट’, ‘भूतनाथ’ हे देखील याच पठडीतील चित्रपट… पण यांचा एकमेकांशी काही संबंध नसल्यामुळे प्रेक्षकांना ते फारसे लक्षात राहिले नाहीत… परंतु, मॅडॉक फिल्म्सने २०१८ मध्ये ‘स्त्री’ (Stree Movie) चित्रपटापासून सुरु केलेला हॉरर-कॉमेडीचा प्रवास आता ‘थामा’ या चित्रपटापर्यंत येऊन ठेपला आहे… विशेष म्हणजे लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत हे युनिवर्स प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे… २०२५ च्या दिवाळीत रिलीज होणाऱ्या ‘थामा’ या चित्रपटाचं कनेक्शन काही अंशी आधीच्या ‘स्त्री’, ‘भेडिया’ किंवा ‘मुंज्या’ (Munjya) चित्रपटासोबत असेलच पण यावेळी प्रेक्षकांना ‘थामा’ चित्रपटात रक्तरंजित प्रेमकथा पाहायला मिळणार आहे…
================================
हे देखील वाचा : बॉलिवूडचं Spy Universe!
=================================
तसेच, ‘स्त्री २’ (Stree 2) चित्रपटाच्या शेवटी अक्षय कुमारची (Akshay Kumar) एन्ट्री बुचकळ्यात पाडणारी होती… सरकटा जर जीवंत राहिला नाही पण त्याच्या शक्तीपासून अक्षय कुमारला मिळालेली ताकद आता नवा कोणता अध्याय मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी जगात येणार हे पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.. याशिवाय, लवकरच ‘भेडिया २’, ‘चामुंडा’ आणि ‘महामुंज्या’ हे चित्रपटही रिलीज होणार आहेत… त्यामुळे केवळ बायोपिक्स किंवा ऐतिहासिक चित्रपटांपेक्षा बॉलिवूडमध्ये कॉमेडी युनिवर्स, कॉप युनिवर्स, स्पाय युनिवर्स आणि अर्थात हॉरर-कॉमेडी युनिवर्स प्रेक्षकांच्या मनोरंनाचं महत्वाचं माध्यम झालं आहे असं चित्र नक्कीच दिसत आहे….(Bollywood movies universe)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi