
‘रामायण’ चित्रपटात Amitabh Bachchan साकारणार ‘ही’ भूमिका!
गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र नितेश तिवारींच्या ‘रामायण’ (Ramayana Movie) चित्रपटाची जोरदार चर्चा आहे… एक तर मल्टीस्टारकास्ट पौराणिक चित्रपट आणि त्यातही बॉलिवूडचा पहिला हजारो करोडोंचा बिग बजेट चित्रपट असून यातील कलाकारांची देखील तितकीच चर्चा सुरु आहे… रामायणमध्ये प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि सीता मातेच्या भूमिकेत साई पल्लवी (Sai Pallavi) दिसणार आहे… आता या चित्रपटातील कलाकारांबदद्ल एक मोठी अपडेट समोर आली असून महानायक अमिताभ बच्चन ‘रामायणा’त दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत… (Amitabh Bachchan News)

बऱ्याच मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ‘रामायण’ मध्ये जटायू हे पात्र व्हीएफएक्सच्या मदतीने साकाराले जाणार असून या पात्राला बच्चन आवाज देणार आहेत… शिवाय असं देखील सांगितलं जात आहे की, जटायू हे पात्र अधिक प्रभावी बनवण्यासाठी अमिताभ यांच्या डोळ्यांचं स्कॅनिंगही करण्यात आलं आहे…

दरम्यान, या पात्रासोबतच अमिताभ बच्चन ‘रामायण’ चित्रपटाचं नरेशन आपल्या भारदस्त आवाजात करणार असं सांगितलं जात आहे… त्यांची दमदार आवाजातील निवेदन शैली चित्रपटाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना रामायणाच्या अद्भुत जगात घेऊन जाईल, अशी निर्मात्यांना आशा आहे. अर्तात अधिकृतपणे याची माहिती अजून दिली गेली नसली तरी प्रेक्षक जटायू आणि चित्रपटाचं नरेशन अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक आहेत…(Bollywood Mythological Movie)
================================
हे देखील वाचा : Mahavatar Narsimha : भारतातील Animated चित्रपटांचं भव्य विश्व
=================================
यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी ‘ब्रह्मास्त्र’ (Bramhastra Movie) या चित्रपटात अभिनयासोबतच निवेदकाची भूमिका देखील बजावली होती… आणि आता पुन्हा एकदा ‘रामायण’ मध्येही बचच्न यांची दुहेरी भूमिका चित्रपटाची भव्यता आणि आवाका वाढवेल यात शंका नाही…. दरम्यान, रामायण चित्रपटात रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्यासोबत यश (Yash) रावणाची, सनी देओल हनुमानाची, तर लारा दत्ता कैकेयीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये रिलीज होणार आहे…(Entertainment)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi