
War 2 Or Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली माजी?
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रजनीकांत यांनी याच वर्षी मनोरंजनसृष्टीतील ५० वर्ष पुर्ण केली… त्यामुळे ‘कुली’ (Coolie) हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी कास आहे… १४ ऑगस्ट २०२५ रोजी कुली रिलीज झाला… याच दिवशी ह्रतिक रोशन आणि एनटीआर यांचा ‘वॉर २’ (War 2) देखील रिलीज झाला होता.. दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईत चुरशीची लढत दिसली होती… जाणून घेऊयात ७ दिवसांमध्ये ‘कुली’ चित्रपटाने किती कमाई केली आहे… (Rajinikanth Movies)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘कुली’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ६५ कोटी, दुसऱ्या दिवशी ५४.७५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३९.५ कोटी, चौथ्या दिवशी ३५.२५ कोटी, पाचव्या दिवशी १२ कोटी, सहाव्या दिवशी ९.५१ कोटी, सातव्या दिवशी आत्तापर्यंत १.३४ कोटी कमवत चित्रपटाने ७ दिवसांमध्ये २१७.३५ कोटींची कमाई केली आहे…(Coolie movie box office collection)
================================
हे देखील वाचा : Rajinikanth : नाहीतर ‘दशावतार’मध्ये दिसले असते रजनीकांत !
=================================
तर, ‘वॉर २’ चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५२ कोटी, दुसऱ्या दिवशी ५७.८५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३३.२५ कोटी, चौथ्या दिवशी ३२.६५ कोटी, पाचव्या दिवशी ८.७५ कोटी, सहाव्या दिवशी ९ कोटी कमवत ७ दिवसांमध्ये या चित्रपटाने १९३.५ कोटी कमावले आहेत… त्यामुळे सध्या तरी रजनीकांत यांचा ‘कुली’ चित्रपट ह्रतिक रोशनच्या ‘वॉर २’ पेक्षा कमाईमध्ये सरस ठरला आहे… आता येत्या काळात रजनीकांत यांचा हा चित्रपट १००० कोटींचा टप्पा गाठू शकेल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे… शिवाय, ‘वॉर’ चित्रपटाचा रेकॉर्ड ‘वॉर २’ मोडेल का हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे…(War 2 box office collection)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi