
Ramayana : ‘ओटीटी किंग’ साकारणार सुग्रीवाची भूमिका!
रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘रामायण’ (Ramayana Movie) या हिंदीतील पहिल्या बिग बजेट पौराणिक चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे… नुकत्याच एका रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन या चित्रपटात जटायूच्या भूमिकेला आवाज देणार असून सोबतच चित्रपटाचं नरेशन देखील करणार आहेत… अशात आता या चित्रपटात सुग्रीव ही भूमिका कोणता कलाकार साकारणार याची मोठी अपडेट समोर येत आहे…

मिळालेल्या काही मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता अमित सियाल (Amit Siyal) ‘रामायण’ चित्रपटात सुग्रीव ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असं सांगितलं जात आहे. सियाल यांची ओळख ओटीटीचा ‘किंग’ अशी केली जाते… त्यामुळे आता या चित्रपटात सुग्रीवासारखी महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी अमित सियालची निवड त्यांच्या करिअरसाठी फार मोठा टर्निंग पॉईंट मानला जात आहे… याआधी सियाल यांनी ‘रेड २’, ‘केसरी २’ अशा अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्यामुळे त्यांची रामायण चित्रपटासाठीची निवड योग्य मानली जात आहे…
================================
=================================
रामायण चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं असून हा भव्य चित्रपट २ भागांमध्ये रिलीज केला जाणार आहे… २०२६ आणि २०२७ च्या दिवाळीत रामायण प्रेक्षकांया भेटीला येणार आहे… या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल, लारा दत्ता असे बरेच कलाकार झळकणार आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi