Karishma Kapoor ने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षितसोबत

Kareena Kapoor : ‘जब वी मेट’ चित्रपटात ‘गीत’च्या भूमिकेत लागलेली ‘ही’ची वर्णी
“मै अपनी फेव्हरेट हु”, या डायलॉगवर कॉपीराईट असणाऱ्या करिना कपूर (Kareena Kapoor) हिने आजवर एकाहून एक दर्जेदार चित्रपट दिले आहेत.. बऱ्याचदा इंडस्ट्रीत असं होतं की एखादा चित्रपट कोणा दुसऱ्या एका अभिनेत्रीला ऑफर केला जातो पण नंतर तिला दुसरीच अभिनेत्री येऊन रिप्लेस करुन जाते… असंच काही सं घडलं होतं इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब वी मेट’ (Jab We Met) चित्रपटाबद्दल… या चित्रपटासाठी आधी दिग्दर्शकाची पहिली चॉईस करिना नसून सलमान खानच्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री होती… कोण होती ती जाणून घेऊयात..

खरं तर, ‘जब वी मेट’ चित्रपटासाठी आधी प्रिती झिंटा हिलाही विचारणा झाली होती, पण तिने नकार दिल्यामुळे दिग्दर्शकाने दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरु केला… शेवटी करिना कपूर गीतच्या भूमिकेसाठी योग्य ठरलीच… परंतु, करीनाच्या आधी या चित्रपटासाठी आणखी एका अभिनेत्रीला साइन करण्यात आले होते. तिने स्वतः हे उघड केले. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सलमान खानच्या (Salman Khan) ‘तेरे नाम’ या चित्रपटातील निर्जरा म्हणजेच भूमिका चावला (Bhumika Chawla) ही होती.

भूमिका चावला हिने काही हिंदी चित्रपट केले त्यापैकी तिचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘तेरे नाम’… बरं, जब वी मेट आधी भूमिका चावलाने ‘मुन्ना भई एमबीबीएस’मध्येही तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्री वर्णी लागली, याबद्दल सांगितले होते. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत भूमिकाने ‘जब वी मेट’ या चित्रपटात करीना कपूरने तिची जागा घेतली तेव्हा ती सुरूवातीला थोडी निराश झाल्याची कबूली दिली होती…(Entertainment Latest News)
भूमिका चावलाने हे देखील म्हटले होते की, “ग्रेसी सिंगला तिच्या जागी संजय दत्तच्या ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ चित्रपटात कास्ट करण्यात आले होते. मला फक्त एकदाच वाईट वाटले होते, जेव्हा मला ‘जब वी मेट’ साइन केले होते पण ते यशस्वी झाले नाही. त्यात बॉबी देओलची जोडी माझ्यासोबत होती आणि चित्रपटाचे नाव ट्रेन होते. त्यानंतर, शाहिद कपूर आणि मी, नंतर शाहिद आणि आयशा आणि त्यानंतर शाहिद आणि करीना कपूर यांना कास्ट करण्यात आले. गोष्टी अशा झाल्या, पण ते ठीक आहे. मला फक्त एकदाच वाईट वाटले आणि पुन्हा कधीही नाही, कारण मी पुढे गेले. मी त्याबद्दल जास्त विचार करत नाही.”

पुढे ती म्हणाली की, ”मी मुन्नाभाई एमबीबीएस (Munnabhai MBBS) साइन केला होता. पण तो पण हातून गेला आणि नंतर मी कन्नाथिल मुथामित्तलमध्ये मणी सरांसोबत काम करू शकले नाही.” तिने राजकुमार हिराणी यांच्याशी झालेल्या तिच्या संभाषणाचा तपशील देखील शेअर केला, ज्यामध्ये हिराणी यांनी तिला आश्वासन दिले की तिची बदली तिच्या कोणत्याही चुकांमुळे झाली नाही. तिने सांगितले की सिनेइंडस्ट्रीत असे निर्णय सामान्य आहेत आणि बहुतेकदा हे निर्णय अनेक कारणांमुळे घेतले जातात, जे कलाकारांच्या कंट्रोलच्या बाहेर असतात.
================================
हे देखील वाचा: Shahid-Kareena : इम्तियाज अलींनी ‘जब मी मेट २’ बद्दल केलं महत्वाचं विधान
================================
दरम्यान, भूमिका चावला हिने हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांसह अनेक सिनेइंडस्ट्रीमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत… मात्र, ‘तेरे नाम’ मधील तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती….(Bollywood news)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi