
Mahavatar Narsimha चित्रपटाने २८ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!
केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ‘महावतार नरसिंहा’ (Mahavatar Narsimha) या Animated चित्रपटाने सध्या सगळ्यांनाच वेड लावलं आहे… नुकत्याच रिलीज झालेल्या ‘कुली’ आणि ‘वॉर २’ चित्रपटाच्या शर्यतीत अजूनही २५ जुलै रोजी रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे… १५ कोटांचं बजेट असणाऱ्या महावतार नरसिंहा या चित्रपटाने आत्तापर्यंत किती कलेक्शन केलं आहे जाणून घेऊयात….(Movies box office collection)

‘Sacnilk’च्या रिपोर्टनुसार, ‘महावतार नरसिंह’ने पहिल्या आठवड्याच्या शेवटी ४४.७५ कोटी, दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी ७३.४ कोटी, तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी ७०.२ कोटी, चौथ्या आठवड्याच्या शेवटी ३०.४ कोटी कमवत आत्तापर्यंत २१९.०२ कोटींची कमाई केली आहे… बऱ्याच काळानंतर Animated चित्रपटाने २०० कोटींचा यशस्वी टप्पा पार केला आहे….
================================
हे देखील वाचा : Mahavatar Narsimha : भारतातील Animated चित्रपटांचं भव्य विश्व!
=================================
दरम्यान, या चित्रपटाच्या यशामुळे निर्माते आणि दिग्दर्शक दोघेही खूप समाधानी असून त्यांच्या आकर्षक विषय, उत्कृष्ट आणि प्रभावी अॅनिमेशन, दमदार संवाद आणि उत्तम दिग्दर्शन याचं कौतुक प्रेक्षकांकडून केलं जात आहे… त्यामुळे सध्या प्रेक्षकांचा Animated चित्रपटांकडे वाढता कल पाहता येत्या काळात अधिक Animated चित्रपट तयार केले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi