
ह्रतिक रोशनच्या ‘War 2’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ?
१४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘वॉर २’ (War 2 movie) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा जरी होत असली तरी वॉर २ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे पाहिलं तर प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे… यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्समधील हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास कुठेतरी कमी पडला असं दिसतंय… जाणून घेऊयात ‘वॉर २’ ने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे…

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘वॉर २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ५२ कोटी, दुसऱ्या दिवशी ५७.८५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३३.२५ कोटी, चौथ्या दिवशी ३२.६५ कोटी, पाचव्या दिवशी ८.७५ कोटी, सहाव्या दिवशी ९ कोटी, सातव्या दिवशी ५.७५ कोटी, आठव्या दिवशी ५ कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण २०४.२५ कोटींची कमाई केली आहे…(War 2 box office collection)
================================
हे देखील वाचा : बॉलिवूडचं Spy Universe!
=================================
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’ चित्रपटात ह्रतिक रोशन, कियारा अडवानी यांच्यासोबत ज्युनिअर एनटीआर प्रमुख भूमिकेत होते… विशेष म्हणजे या चित्रपटातून ज्यु.एनटीआर (Jr NTR) याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं… ‘वॉर २’ च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा पार केला होता… त्यामुळे आता हा चित्रपट तो आकडा पार करु शकेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागंल आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi