Karishma Kapoor ने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षितसोबत

Rajinikanth आणि मिथुन चक्रवर्ती ३० वर्षांनी पुन्हा एकत्र दिसणार?
भारतीय चित्रपटसृष्टीतील ग्रेट अभिनेते बऱ्याच वर्षांनी स्क्रिन शेअर करताना दिसत आहेत… यात आता मिथुन चक्रवर्ती (Mithoon Chakaraborthy) आणि रजनीकांत (Rajinikanth) या जोडीचा देखील समावेश झाला असून तब्बल ३० वर्षांनी हे दोन दिग्गज कलाकार एका चित्रपटात झळकणार आहेत… कोणता आहे तो चित्रपट जाणून घेऊयात…(Entertainment News)
तर, रजनीकांत यांच्या ‘जेलर’ (Jailer Movie) या सुपरहिट चित्रपटानंतर याचा दुसरा भाग ‘जेलर २’ (Jailer 2) लवकरच भेटीला येणार असून यात मिथुन चक्रवर्ती महत्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं जात आहे…

एका मुलाखतीत मिथुन यांनी लवकरच ते ‘जेलर २’ चित्रपटाचं शुटींग सुरु करणार असल्याचं म्हणाले… तसेच, रजनीकांत आणि त्यांच्यातील मैत्रीबद्दल बोलताना मिथुन म्हणाले की,: “रजनीकांत यांच्याशी माझी खुप जुनी मैत्री आहे… आम्ही जरी वेगवेगळ्या भाषांतील चित्रपटांतून कामं करत असलो तरी आम्ही मनापासून जोडले गेलो आहोत…”
================================
हे देखील वाचा : Rajinikanth : नाहीतर ‘दशावतार’मध्ये दिसले असते रजनीकांत !
=================================
दरम्यान, बऱ्याच वर्षांपूर्वी मिथुन चक्रवर्तींच्या १९८९ मध्ये ‘भ्रष्टाचार’ या हिंदी आणि १९९७ मध्ये ‘भाग्य देवता’ या बंगाली चित्रपटात रजनीकांत यांनी काम केलं होतं…आणि आता पुन्हा एकदा या दोन सुपरस्टार्सना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत…सध्या थिएटरमध्ये रजनीकांत यांचा ‘कुली’ (Coolie) चित्रपट धुमाकूळ घालत आहे… तर मिथुन यांचा ‘द बंगाल फाईल्स’ (The Bengal Files) चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi