
Bigg Boss मध्ये होणार अंडरटेकर आणि माईक टायसनची दमदार एन्ट्री !
Bigg Bossच्या प्रेक्षकांसाठी यंदाचा सीझन काहीसा वेगळा आणि भन्नाट ठरणार आहे. भाईजान सलमान खान (Salman Khan) सूत्रसंचालन करणार असलेला बिग बॉस १९ (Bigg Boss 19) हा शो २४ ऑगस्ट २०२५ पासून कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक वेळी वाद, भांडणं, टास्क आणि नातेसंबंधांमुळे चर्चेत राहणारा हा शो यंदा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे, कारण घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून दोन ग्लोबल आयकॉन दिसणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अनेकांच्या बालपणीचा हिरो आणि डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) सुपरस्टार ‘अंडरटेकर’ यंदा बिग बॉस १९ मध्ये येणार आहे. नुकताच ३० वर्षांच्या करिअरनंतर अंडरटेकर WWEमधून रिटायर झाला होता. त्यामुळे आता टेलिव्हिजन विश्व गाजवायला तो सज्ज झाला आहे. यासोबतच बिग बॉसमध्ये आणखी एक सेलेब्रिटी येणार येणार आहे.(Bigg Boss 19)

तो म्हणजे बॉक्सिंग लीजंड माईक टायसन ! तसा माईक टायसनसुद्धा रिटायर झाला आहे, पण त्याची क्रेज अजूनही कमी झालेली नाही. नुकताच तो बॉलीवूड चित्रपट ‘लायगर’मध्ये झळकला होता. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. असं सांगितलं जातं की, या चित्रपटात एका Cameo साठी त्याने तब्बल २५ कोटी रुपये इतकं मानधन घेतलं होतं. त्यामुळे आता बिग बॉसमध्ये आल्यानंतर अंडरटेकर आणि माईक टायसन किती मानधन घेतील, याकडेच सर्वांचं लक्ष आहे. तसं सलमान खान एका एपिसोडचे तब्बल १० कोटी रुपये घेतो.

नोव्हेंबर महिन्यात अंडरटेकर एक आठवडाभर शोमध्ये राहील, अशी चर्चा रंगली आहे. अंडरटेकरचा दमदार लूक, त्याची लोकप्रियता आणि वेगळं व्यक्तिमत्व पाहता तो घरात आला तर प्रेक्षकांसाठी हा अनुभव ऐतिहासिक ठरणार आहे. तर माईक टायसन ऑक्टोबर महिन्यात काही दिवसांसाठी तो घरात येईल, अशी चर्चा आहे. टायसनचा आक्रमक अंदाज, त्याची आंतरराष्ट्रीय ओळख आणि भव्य व्यक्तिमत्वामुळे प्रेक्षकांना घरात प्रचंड नवा उत्साह आणि खरा ‘राडा’ पाहायला मिळू शकतो. जरी अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.(Bigg Boss 19)
================================
================================
दरम्यान, या सीझनसाठी चर्चेत असलेल्या स्पर्धकांच्या यादीत गौरव खन्ना, अशनूर कौर, बसीर अली, अभिषेक बजाज आणि सिवेट तोमर या कलाकारांची नावे आहेत. तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अवेझ दरबार आणि नगमा मिराजकर देखील सहभागी होऊ शकतात. यंदा शोची थीम ‘राजकारण’ (Politics) असणार आहे, अशी माहिती मिळते. बिग बॉसचं घर नेहमीच भांडणं, दोस्ती, प्रेमळ क्षण आणि भावनिक प्रसंगांनी रंगलेलं असतं. पण अंडरटेकर आणि माईक टायसन सारखे आंतरराष्ट्रीय सुपरस्टार्स घरात आले तर हा सीझन आतापर्यंतचा सर्वात आयकॉनिक सीझन ठरू शकतो यात शंका नाही.