Prasad Oak : ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

Akshay Kumar तब्बल १७ वर्षांनंतर ‘या’ अभिनेत्यासोबत चित्रपटात एकत्र झळकणार!
भारतीय चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येत असून निराळे प्रयोगही मेकर्स करताना दिसत आहेत… सध्या प्रेक्षकांना हॉरर कॉमेडी किंवा कोर्टरुम ड्रामा मग ते कुठल्याही भाषेतील असले तरी प्रचंड आवडतायत… यात विशेष नाव घ्यावं ते म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांच्या ‘जॉली एल.एल.बी ३’ (Jolly LLB 3) चित्रपटाचं… एकीकडे या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु असताना दुसरीकडे अक्षयने आणखी एका चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात केली आहे… विशेष म्हणजे यात तो सैफ अली खान याच्यासोबत तब्बल १७ वर्षांनी स्क्रिन शेअर करणार आहे…(Entertainment News)

तर, २००८ साली आलेल्या ‘टशन’ (Tashan Movie)) चित्रपटात अक्षय कुमार, सैफ अली खान आणि करिना कपूर हे कलाकार झळकले होते… याच चित्रपटामुळे सैफ आणि करिनाचं सुत जुळलं होतं… आणि आता या चित्रपटाच्या यशानंतर सैफ आणि अक्षय आगामी ‘हैवान’ (Haiwan Movie) चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत… विशेष म्हणजे ‘हेरा फेरी’, ‘भूल भूलैय्या’ (Bhool Bhulaiya) असे दर्जेदार चित्रपट देणाऱ्या प्रियदर्शन (Priyadarshan) यांच्यासोबत पुन्हा अक्षय काम करत असल्यामुळे प्रेक्षकांना आता पुन्हा प्रियदर्शन स्टाईलचे विनोदी चित्रपट पाहायला मिळणार आहेत…

अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांनी ‘हैवान’ या चित्रपटाची शुटींग सुरु केली असून शूटच्या पहिल्या दिवसाचा व्हिडीओ अक्षयने अलीकडेच आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे… या व्हिडीओमध्ये तो सैफ अली खान आणि प्रियदर्शन यांच्याशी चर्चा करताना दिसतोय आणि अक्षयच्या हातात चित्रपटाच्या नावाची पाटी देखील पाहायला मिळत आहे.(Haiwan Movie News)
================================
हे देखील वाचा : मराठी नाटक पाहून भारावली Tabu, कलाकारांचं केलं तोंडभरून कौतुक!
=================================
अक्षयने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन लिहिलं आहे की, ‘आपण सगळेच थोडेसे शैतान आहोत. कुणी वरून संत, तर कुणी आतून हैवान. माझ्या आवडत्या दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या ‘हैवान’ चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात केली आहे. तब्बल 18 वर्षांनंतर सैफसोबत काम करताना खूप उत्साह आणि आनंद वाटत आहे. चला, आता हैवानियतला सुरुवात करूया.’ दरम्यान, टशन चित्रपटापूर्वी अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांनी यापूर्वी ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’, ‘ये दिल्लगी’, ‘तू चोर मैं सिपाही’, ‘कीमत’ अशा चित्रपटांत एकत्र काम केलं आहे…(Bollywood)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi