Prasad Oak : ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

Nashibvan Marathi Serial: ‘रुद्र प्रताप घोरपडे’ च्या भूमिकेत आदिनाथ कोठारेची मालिका विश्वात पुन्हा एंट्री होणार?
स्टार प्रवाह वाहिनीवर नेहमीच प्रेक्षकांसाठी नवनव्या मालिकांचा आनंददायी मेळा सजत असतो. पुढील महिन्यातही वाहिनी प्रेक्षकांना एक नव्या प्रवासाला घेऊन जाणार आहे. कृतिका देव, चेतन वडनेरे आणि रुपाली भोसले यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘लपंडाव’ ही मालिका १५ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या सुरूवातीसोबतच आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांसमोर येणार असल्याची घोषणा झाली आहे. या दुसऱ्या मालिकेत नायकाची भूमिका कोण साकारणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, अलीकडेच प्रसारित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये या नायकाचा पाठमोरा लूक दाखवण्यात आला असून त्याचा चेहरा मुद्दाम दडवण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलाच उधाण आलं आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली असून, हा नायक कोण असू शकतो याविषयी वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.(Nashibvan Marathi Serial)

‘नशीबवान’ ही नवी मालिका देखील १५ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अजय पूरकर दमदार खलनायकाची भूमिका साकारणार असून त्यांचं पात्र ‘नागेश्वर घोरपडे’ असं असणार आहे. या मालिकेची नायिका नागेश्वरचीच मुलगी असून ही भूमिका अभिनेत्री नेहा नाईक साकारणार आहे. याशिवाय प्राजक्ता केळकर देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे, तब्बल दहा वर्षांनी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून, त्या देखील या मालिकेत दिसणार आहेत.

मालिकेतील नायकाच्या भूमिकेबद्दल मात्र उत्सुकतेचा ठसा कायम आहे. नुकत्याच रीलिज झालेल्या मोशन पोस्टरमध्ये ‘रुद्र प्रताप घोरपडे’ नावाचा हा नायक पाठमोरा दिसतो आहे. वाहिनीकडून “तुम्हाला भेटायला येतायत रुद्र प्रताप घोरपडे” अशा कॅप्शनसह हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. चाहत्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा वर्षाव करत नायक कोण असू शकतो याबद्दल अनेक अटकळी लावल्या आहेत.(Nashibvan Marathi Serial)
============================
हे देखील वाचा: Aranya Movie Teaser: हार्दिक जोशीच्या ‘अरण्य’ सिनेमाचा दमदार टीझर रिलीज प्रदर्शित !
============================
काही प्रेक्षकांच्या मते, हा नायक आदिनाथ कोठारे असू शकतो. कारण ही मालिका कोठारे व्हिजन या निर्मिती संस्थेची आहे. आदिनाथने याआधी झी मराठीवरील ‘100 डेज’ मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती, तसेच तो हिंदी ओटीटीवरही सक्रीय आहे. तर काही चाहत्यांना वाटतंय की ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता राज हंचनाळे या भूमिकेत दिसेल. तरीही आदिनाथच या भूमिकेत झळकणार असल्याचे संकेत कमेंट्सवरून मिळत आहेत. २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता नायकाच्या चेहऱ्यावरील रहस्य अखेर उलगडणार आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये ‘नशीबवान’ या मालिकेबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.