स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

Alia Bhatt-Ranbir Kapoor यांचा बंगला तयार झाला?
बॉलिवूडचं क्युट कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) एकीकडे दर्जेदार चित्रपट त्यांच्या चाहत्यांना देत आहेतच… मात्र, आपल्या आवडत्या कलाकाराच्या वैयक्तिक जीवनात सहसा चाहत्यांना फारसा रस असतो… अशातच गेल्या बऱ्याच महिन्यांपासून रणबीर आणि आलियाच्या नव्या घराची चर्चा सुरु आहे… त्यांनी आपली मुलगी राहा (Raha Kaporr) हिच्यासाठी हा खास बंगला बांधला आहे…

मिळालेल्या माहितीनुसार, आलिया भटट् आणि रणबीर कपूर यांच्या या नव्या कोऱ्या घराची किंमत जवळपास २५० कोटी आहे असं सांगितलं जात आहे… या घराची खासियत केवळ त्याची भव्यता नसून संपूर्ण कपूर कुटुंबाशी नातंही जोडलेलं आहे. ज्या जमिनीवर हा बंगला उभा केला आहे त्याची मालकी राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांची होती. १९८० मध्ये हा बंगला ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या नावे करण्यात आला होता. आता रणबीर आणि आलिया यांनी त्याच ठिकाणी त्यांचं नवं घर उभं केलं आहे… (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Parineeti Chopra आणि राघव चढ्ढा यांच्या घरी येणार चिमुकला पाहुणा!
=================================
दरम्यान, रणबीर कपूर याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर लवकरच त्याचा ‘रामायण’ (Ramayana Movie) हा चित्रपट रिलीज होणार आहे… तसेच, आलिया यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्समध्ये एन्ट्री करणार असून तिचा ‘अल्फा’ (Alpha Movie) चित्रपटही लवकरच येणार आहे… शिवाय, रणबीर कपूर आणि आलिया ‘लव्ह एण्ड वॉर’ (Love and War) चित्रपटात एकत्र दिसणार असून यात विकी कौशल देखील असणार आहे…(Bollywood News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi