हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Bollywood Celebrity : सलमान खान ते जॅकलिन फर्नांडिस; पाहूयात कलाकारांच्या घरचा बाप्पा!
गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र भक्तीमय वातावरण झालं आहे.. सामान्य लोकांपासून ते कलाकारांपर्यंत सगळेच बाप्पाच्या सेवेत मग्न झाले आहेत.. चला तर पाहूयात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरचे बाप्पा…

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने पहिल्यांदाच तिच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं आहे… भक्ती भावाने ती गणरायाच्या सेवेत मग्न झाली असून सोशल मिडियावर तिने फोटो शेअर केले आहेत…

दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता सलमान खान याने आपल्या घरी बाप्पा आणला आहे… संपूर्ण कुटुंबासोबत तो बाप्पाची आरती करताना दिसत असून सोशल मिडियावर सध्या सलमानच्या घरच्या बाप्पाचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाला आहे…

एकीकडे गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सिनेविश्वात सुरु असताना त्यांच्या घरी बाप्पा विराजमान करत दोघांनी एकत्रितपणे सण साजरा केला आहे..

अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या दोन्ही मुलांनी Jeh आणि Taimur यांनी आपल्या हाताने बाप्पाची लहानशी मुर्ती तयार केली आहे… करिनाने हा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे…

अभिनेत्री शर्वरी वाघ हिने दरवर्षीप्रमाणे आपल्या मोरगाव या गावी जाऊन घरातील गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे… आई आणि बहिणीसोबत तिने फोटो शेअर केला आहे…
