Heer Ranjha या सिनेमाचे सर्व संवाद काव्यात्मक शैलीत (Poetic Form)

Tharal Tar Mag मालिकेतील अमित भानुशालीला बाप्पाने दिला खास आशीर्वाद; गणेशोत्सवा आधीच पूर्ण झालं मोठं स्वप्न !
‘ठरलं तर मग’ या मालिकेमधून अर्जुन सुभेदारची दमदार भूमिका साकारत अभिनेता अमित भानुशाली घराघरात पोहोचला. कोर्टात लढणारा कणखर वकील म्हणून त्याने प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात खास स्थान मिळवलं. विशेष म्हणजे स्वतः मराठी नसतानाही त्याने मालिकेसाठी घेतलेली मेहनत आणि ५० पानांची स्क्रिप्ट पाठ करण्याचा जिद्दीने घेतलेला प्रयत्न या सगळ्यामुळे तो आज मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक ठरला आहे. अभिनयाच्या मेहनती इतकाच त्याचा वैयक्तिक जीवनातील प्रवासही प्रेरणादायी आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने अमित आणि त्याची पत्नी श्रद्धा यांनी मुलाखतीत एक इच्छा व्यक्त केली होती ती होत एका नवीन घराचं स्वप्न. तेव्हा त्यांनी बाप्पाला मनापासून प्रार्थना केली होती की स्वतःचं घर व्हावं. आणि यंदा गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच ही इच्छा प्रत्यक्षात उतरली आहे.(Actor Amit Bhanushali)

अमित आणि श्रद्धाने नुकतंच मुंबईत ३६ व्या मजल्यावर आलिशान घर घेतलं आहे. एका मुलाखतीत अमितने सांगितलं की, हे घर हे फक्त एक स्वप्न नव्हतं तर त्यांच्या कुटुंबासाठी एक मोठं यश आहे. श्रद्धानेही आनंद व्यक्त करताना सांगितलं की, “गेल्या वर्षी आम्ही बाप्पाकडे जी इच्छा केली होती ती यंदा पूर्ण झाली. या घरामुळे आमच्या कुटुंबातील प्रत्येकाचं स्वप्न साकार झालंय.” अमितच्या शेजाऱ्यांनाही त्याच्या नवीन घराबद्दल प्रचंड आनंद आहे अस ही तो म्हणाला. एकाने तर गंमतीत म्हटलं, “अमित-श्रद्धाचा मुलगा हृिधानमुळे आमचा ३६ वा मजला आता गजबजून गेला आहे.” म्हणजेच या नव्या घरामुळे त्यांच्या आयुष्यात आणि शेजाऱ्यांच्या आयुष्यातही आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

अमित सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायलीच्या भूतकाळाचा शोध घेताना दिसत आहे. मधुभाऊंकडून त्याला सायलीचे आई-वडील अजून जिवंत असल्याचा इशारा मिळाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. त्याच्या अभिनयाने आणि मेहनतीने मालिकेला मिळालेलं यश ही त्याच्या कारकिर्दीची खास कमाई आहे.(Actor Amit Bhanushali)
================================
================================
गेल्या वर्षीची साधीशी प्रार्थना आणि यंदा प्रत्यक्षात उतरलेलं स्वप्न यातून अमित आणि श्रद्धाचा बाप्पावर असलेला विश्वास अधिक दृढ झालेला आहे. त्यांच्या जीवन प्रवासासोबतच हा छोटासा प्रसंगही सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरतो.