Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Bigg Boss 19: प्रणित मोरेवर सलमान खानचा संताप, पहिल्याच विकेंड वारमध्ये दबंग भाईने सुनावलं

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

Shakti Samanta : हिट सिनेमांचा सुपरहिट दिग्दर्शक

Pallavi Joshi यांनी मराठी जेवणाबाबतच्या विवेक अग्निहोत्रींच्या त्या विधानावर केली

Nagraj Manjule : शाळेत असतानाच लागलेलं दारुचं व्यसन पण….; नागराज

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न;

हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न; ‘त्या’ विधानावरुन संताप

 “नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न; ‘त्या’ विधानावरुन संताप
मिक्स मसाला

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न; ‘त्या’ विधानावरुन संताप

by रसिका शिंदे-पॉल 30/08/2025

अभिनेता किंवा अभिनेत्री होणं फार कठीण आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही… पण अलीकडे सोशल मीडिया influencers यांना त्यांच्या रिल्समुळे चित्रपटात घेतलं जातंय आणि याची बरीच उदाहरणं आपण पाहिलीयेत… शिवाय कलाकारांचा सोशल मिडिया प्रेजेन्स, त्यांचे फोलोअर्स बघुनही त्यांना कास्ट केलं जात असल्याचंही आपण ऐकलंय… आता याच रिल स्टार्सवरुन काही दिवसांपूर्वी अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात एक विधान केलं होतं, की ज्यांना रिल्स करुन आपण अभिनेते किंवा अभिनेत्री आहोत असं वाटतंय हा समाजात मोठा गैरसमज पसरत चाललाय…आता त्याच्या या विधानावर बऱ्याच सोशल मीडिया influencers नी आपली मतं मांडली आहेत… नेमकं काय आहे हे प्रकरण? चला जाणून घेऊयात…(Marathi Entertainment News)

हल्लीच्या काळात इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स बघून कास्टिंग केलं जातं. काही कलाकार सिनेमा, मालिकांमध्येही झळकतe/l. पण हे चुकीचं असून रील्स हा अभिनय नसल्याचं अनेक कलाकारांनी म्हटलंय. अशातच हास्यजत्रेमध्ये या विषयावरील स्किट सादर करण्यात आलं होतं.. याच विषयावर आधारित ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमात स्किट सादर केलं होतं… यावर प्रसाद असं म्हणाला होता की, ‘हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. रील्स करून ज्यांना वाटतं की आपण अभिनेता किंवा अभिनेत्री आहोत हा प्रचंड मोठा गैरसमज समाजात पसरत चाललाय. ज्या लोकांच्या रील्सला लाखो व्ह्यूज आहेत त्यांचं नाटक पाहण्यासाठी १० माणसं सुद्धा येत नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे रील व्हिडीओ करून आपण स्टार होऊ असं कोणाला वाटत असेल तर हा खूप मोठा भ्रम आहे, गैरसमज आहे. रील्स म्हणजे अभिनय नाही. हा विषय सर्वांपर्यंत पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं होतं. या स्किटद्वारे अनेक जणांना विविध गोष्टी शिकता येतील, ज्यांना काही शिकायचं नाहीये त्यांचा मार्ग देखील मोकळा आहे.’

================================

हे देखील वाचा: Jayashree Gadkar : एका फोटोमुळे कसं बदललं जयश्री यांचं आयुष्य?

=================================

अभिनेता पार्थ भालेराव एका मुलाखतीत म्हणालाय की, “या टीव्ही आणि रिल्समुळे असं होतं की मी वारंवार लोकांसमोर येत राहणार. ते ही फ्रीमध्ये. त्यामुळे मी टीव्हीवर फारसा दिसत नाही आणि रिल्स कधी बनवतही नाही, काही ठराविक गोष्टीच मी सोशल मीडियावर टाकतो. दररोजच्या मालिका आणि रिल्समुळे मी त्यांना फ्रिमध्ये दिसणार अशावेळी ३०० रुपये तिकीट काढून त्यांना थिएटरपर्यंत बोलवणं अवघड होऊन बसतं. हे ऐकताना पचन होत नसेल पण याची बरीच उदाहरणं आहेत. आताचाच एक मोठा सिनेमा हा खूप जोरात आपटला, ज्याचं कास्टिंगच फॉलोअर्स आणि सोशल नंबरवर आधारीत होतं. त्याआधीही असाच एक प्रयत्न झाला होता. अशी अनेक उदाहरणं आहेत. १० वर्षांपूर्वी टीव्हीवर काम करणाऱ्या कलाकारांचा एक चित्रपट आला तोही वर्कआउट झाला नाही. यामागची प्रेक्षकांची मानसिकता अशी आहे की, ज्यांना मी रोज टीव्हीवर बघतोय त्यांच्यासाठी ३०० रुपयांचं तिकीट काढून जाणं हे अवघड होऊन बसतं. एखादा कलाकार कधीतरी येतो तेव्हा मी पैसे काढून जाईन बघायला असं त्यांचं मत असतं.” (Reel stars)

यावर बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक रिल स्टार धनंजय पोवारने म्हटलंय की, “जे प्रसाद ओक बोलले हे थोडे फार प्रमाणात मी मान्य करू शकतो. त्याचे कारण पण मी इथे सांगतो की नाटकासाठी खरंच खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती सहजा सहजी जमत नाही. पण आमचे क्रिएटर म्हणजे आकाश भापकर आणि अथर्व सुदामे यांनी हाउसफुल शो करून दाखवले आहेत. मान्य आहे की आम्ही एक मिनिटांचा रील करतो पण आम्ही स्वतः स्क्रिप्ट लिहितो स्वतः एडिट करतो. ही मेहनत तुम्ही नाही करत ना पण आम्ही करतो. आम्हालाही कला आहे आम्ही ही कला करतो आम्हालासुद्धा थोडीशी का होईना रिस्पेक्ट आहे ती तुम्ही द्यावी कारण आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देतो. मला या गोष्टीचा राग नाही की तुमच्या नजरेत आम्ही शून्य आहोत पण आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही पण लोकांना हसवून त्यांना छोटासा का होईना आनंद देतो. मी स्वतः बिगबॉस मध्ये असताना एकही क्रिएटरला कमी लेखलो नाही कारण त्या लोकांसाठी आम्हाला एक प्लॅटफॉर्म उभा करता येईल या उद्देशाने जगलो. प्रसाद ओक सर तुम्ही एकदा माझा मेसेज बॉक्स उघडा मी तुमचा केवढा मोठा चाहता आहे हे कळेल.”

================================

हे देखील वाचा : Bahubali To KGF; साऊथच्या हिट चित्रपटांना ‘या’ मराठी कलाकांनी दिला दमदार आवाज

=================================

तर, सिद्धांत सरफरेने देखील आपलं मत मांडताना असं म्हटलं की, “मी अभिनेता आहे रील्सवरती जरा स्लॅपस्टिक करावं लागतं ज्याला ओव्हर म्हणतात. पण मला आतापर्यंत जे मायबाप रसिक प्रेक्षकांचे प्रतिसाद आले आहेत. माझ्या अभिनयासाठी आणि माझ्या कन्टेंटसाठी ते सर्व काही सांगून जातात. नवोदित कलाकार कसा मोठा होणार? तर असा रील्स करून स्वतःची कला लोकांपर्यंत पोहोचवून. नाहीतर फक्त ऑडिशन ऑडिशन ऑडिशन… बस्स आणि मुळात मला बोलायचं कारण हेच की मला रील्स या क्षेत्रात खूप काही अनुभवायला शिकायला आणि आपली कला सादर करायला मिळाली. रिल करणारा हा अभिनेता नसतो असं नाही. खूप चांगले कलाकार सुद्ध रिल्स करू शकतात. फरक एवढाच आहे की टेलिव्हजन, सिनेमा तसं रिल्ससुद्धा एक कलाकाराला आपली कला दाखवण्याचा मार्ग आहे”…

रिल्स स्टार्स यांना अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणायचं की नाही किंवा ऑडिशन घेण्याचं हे नवं माध्यम झालं आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय… त्यामुळे आता यावर कलाकार आणि बाकी सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर्स काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood News dhananjay powar Entertainment News entertainment news in marathi marathi content creators Parth Bhalerao Prasad Oak prasad oak news reel stars siddhant sarfare social media influencers
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.