लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित
हार्दिक जोशी आणि वीणा जगताप यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या अरण्य चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता.. आता या चित्रपटातील गाणं रिलीज झालं आहे… जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आता या चित्रपटातील ‘रेला रेला’ हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

हार्दिक जोशी आणि वीणा जगताप यांच्या लग्नसोहळ्यावर चित्रित झालेलं हे गाणं गायक अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाजात गायलं आहे… दरम्यान याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करताना दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे म्हणतात की, ” ‘रेला रेला’ हे गाणं प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं आहे. अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाजासोबत नितीन उगलमुगळे यांचं कमाल संगीत गाण्याला चारचाँद लावतात. या गाण्यातून विदर्भातील संस्कृतीची झलक प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.”
================================
हे देखील वाचा: Jayashree Gadkar : एका फोटोमुळे कसं बदललं जयश्री यांचं आयुष्य?
=================================
एस एस स्टुडिओ निर्मित आणि एक्स्पो प्रस्तुत ‘अरण्य’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अमोल दिगांबर करंबे यांनी केलं आहे. शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतिका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, चेतन चावडा आणि अमोल खापरे यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत. हा भव्य प्रवास येत्या १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.