Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

 लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
मिक्स मसाला

लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

by रसिका शिंदे-पॉल 31/08/2025

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं ३१ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं… गेल्या काही महिन्यांपासून तिची कॅन्सरशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली… वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी तिने मुंबईत तिच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला… तिच्या निधनामुळे खरोखरीच मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटविश्वात पोकळी निर्माण झाली आहे… प्रिया मराठे हिने आजवर विविधांगी भूमिका साकारल्या… परंतु, पवित्र रिश्ता या हिंदी आणि चार दिवस सासूचे या मराठी मालिकेतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या…

प्रिया मराठे हिने २००१ मध्ये आलेल्या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेत सोना देशमुख ही भूमिका साकारली होती… त्यानंतर अभिनेत्री म्हणून ‘या सुखांनो या’ मालिकेतून तिने खरं पदार्पण केलं होतं… त्यानंतर पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून तिला अधिक लोकप्रियता मिळाली होती… प्रियाने ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘तु तिथे मी’, ‘उतरन’ अशा अनेक मराठी-हिंदी मालिकांमध्ये तिने कामं केली होती…प्रियाने मालिका करुनही रंगभूमीकडे दुर्लक्ष केलं नव्हतं… एकीकडे मालिका सुरु असताना प्रिया अनिकेत विश्वासरावसोबत ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ या नाटकात ती काम करत होती…

============================

हे देखील वाचा: Tharal Tar Mag मालिकेतील अमित भानुशालीला बाप्पाने दिला खास आशीर्वाद; गणेशोत्सवा आधीच पूर्ण झालं मोठं स्वप्न !

============================

प्रिया हिने फार कमी वर्षांमध्ये इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली होती… ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनु मोघे याच्याशी तिने लग्न केलं होतं… दोघांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत एकत्र काम देखील केलं होतं… अतिशय कमी वयात सिनेसृष्टीतून अचानक प्रियाची झालेली एक्झिट प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारी आहे…

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bollywood update Entertainment marathi actress marathi daily soaps pavitra rishta priya marathe
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.