लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Rajinikanth यांच्या कुली चित्रपटाने पार केला ५०० कोटींचा आकडा!
साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी या वर्षी सिनेसृष्टीतील ५० वर्ष पुर्ण केली…आणि याच निमित्ताने त्यांचा ‘कुली’ (Coolie) हा चित्रपट रिलीज झाला होता… खऱ्या अर्थाने हा एक पॅन इंडिया चित्रपट होता कारण यात मल्याळम, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नडा अशा सर्व भाषिक इंडस्ट्रीतील कलाकार यात होते… १४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने २० दिवसांमध्ये किती कमाई केली आहे जाणून घेऊयात…

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘कुली’ चित्रपटाने पहिल्या दिवसाची ओपनिंग ६५ कोटी कमवत सुरु केली होती… त्यानंतर चित्रपटाने पहिल्या आठवड्याच्या शेवटी २२९.६५ कोटी, दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी ४१.८५ कोटी कमवत २० दिवसांत या चित्रपटाने एकूण २८०.५८ कोटी कमावले आहेत… तसेच, जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पार केला असून कुली हा चौथा तमिळ चित्रपट ठरला आहे आहे…(Coolie box office collection)
============================
हे देखील वाचा : Janhvi Kapoor आणि Siddharth Malhotra यांच्या ‘परम सुंदरी’चं कलेक्शन झालं तरी किती?
============================
दरम्यान, रजनीकांत यांच्या इतर काही चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, २०१८ मध्ये आलेल्या 2.0 या चित्रपटाने जगभरात तब्बल ७०० कोटींची कमाई केली होती… यानंतर त्यांच्या ‘जेलर’ (२०२३) चित्रपटाने जगभरात ६५० कोटी कमावले होते… रजनीकांत यांनी केवळ आपल्या अभिनयाची जादू देशभरातच नाही तर जगभरात पसरवली आहे… आता लवकरच रजनीकांत यांचा ‘जेलर २’ (Jailer 2) येणार असून प्रेक्षक यासह त्यांच्या बऱ्याच चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात आहेत… (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi