Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

Tiger Shroff : बागी ते बागी ३; जाणून घेऊयात बॉक्स ऑफिस कलेक्शन
अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या आगामी ‘बागी ४’ (Baaghi 4) चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे… सिंघम अगेन चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारल्यानंतर आता त्याच्याच बागी फ्रेचायझीमधील चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… ‘हिरोपंती’ (Heropanti) चित्रपटापासून सुरु झालेला टायगरचा अभिनयाचा प्रवास ‘बागी ४’ पर्यंत पोहोचला आहे.. चला तर जाणून घेऊयात टायगरच्या ‘बागी’ चित्रपटांच्या आजवरच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल…

२०१६ मध्ये टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘बागी’ चित्रपट रिलीज झाला होता… ३७ कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने जगभरात १२५.९० कोटी आणि भारतात १०२.७४ कोटी कमावले होते… त्यानंतर २०१८ मध्ये ‘बागी २’ रिलीज झाला होता.. ७५ कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने जगभरात २५७ कोटी आणि भारतात १६५.५ कोटी कमावले होते…(Baaghi movie box office collection)

यानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा ‘बागी ३’ रिलीज झाला.. २०२० मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात टायगर सोबत श्रद्धा कपूर, अंकिता लोखंडे आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका होत्या… १०० कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने जगात १३७ कोटी आणि भारतात ९० कोटी कमावले होते… आता आता तब्बल ५ वर्षांनी ‘बागी ४’ येणार असून चित्रपटाचं बजेट किती असणार आणि आधी आलेल्या ३ भागांचं कलेक्शनचं रेकॉर्ड हा चित्रपट मोडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…
====================================
हे देखील वाचा : Nana Patekar यांनी संजय दत्तला का केलं होतं बॉयकॉट?
====================================
दरम्यान, ‘बागी ४’ मध्ये संजय दत्त (Sanjay Dutt) खलनायकाची भूमिका साकारत असून पुन्हा एकदा त्याचा जबरा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे… चित्रपटात टायगर श्रॉफ सोबत हरनाज संधू, सोनम बवेजा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत… ५ सप्टेंबर २०२५ रोजी ‘बागी ४’ देशभरात रिलीज होणार आहे…(Baaghi 4)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi